धक्कादायक! सकाळी शेतातली भाजी घेऊन जायला सांगितली… विधवा महिलेला केली जबरदस्ती
केज तालुक्यामध्ये विधवेला शेतात भाजी काढण्यासाठी बोलावलं आणि त्या वेळेचा फायदा घेत एका नराधमाने त्यांच्यासोबत अनैतिक काम केलं.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस(Beed) ठाण्याच्या हद्दीत ३५ वर्षीय विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ५७ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सावळेश्वर (पैठण) येथील मधुकर उर्फ मदन विश्वनाथ म्हस्के (वय ५७) याने पीडित महिलेला शेतातील भाजीपाला घेऊन जाण्याच्या बहाण्याने शेतात बोलावले. सकाळच्या सुमारास ती महिला शेतात गेली असता, एकटेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसंच, या घटनेची कुणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत फिर्यादीने नमूद आहे.
क्रूर घटना! बीड जिल्ह्यात 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, गावकाऱ्यांची संतापजनक भूमिका
या घटनेनंतर पीडितेने केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नं ३२६/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आरोपीला तात्काळ अटक केल्याने पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत असलं तरी अशा घटना रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसह आवश्यक समुपदेशन व संरक्षण देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
