सत्तारांचा पाय खोलात! निवडणूक अधिकाऱ्याच्या मदतीने निकाल फिरवल्याचा आरोप, कोर्टात याचिकाही दाखल

  • Written By: Published:
सत्तारांचा पाय खोलात! निवडणूक अधिकाऱ्याच्या मदतीने निकाल फिरवल्याचा आरोप, कोर्टात याचिकाही दाखल

Abdul Sattar : विधानसभा निवडणुकी (Vidhansabha Eletion) जनतेने महायुतीला (Mahayuti) कौल दिला आहे. पण विधानसभेच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर (EVM) शंका घेतली. या सर्व घडामोडी सुरू असताना आता शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणी वाढ झाली. निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी धरून सत्तारांनी निकाल फिरवल्याचा आरोप होतोय. तसेच त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिकाही सिल्लोड न्यायालयात (Sillod court) दाखल करण्यात आली.

‘किमान तीन मुलं असावीत’, अन्यथा….; सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 

सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सत्तार २४२० मतांनी निवडून आले. मात्र, त्यांच्या विजयावर शंका उपस्थित होतेय. सत्तार यांनी निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी धरून निकाल फिरवल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. तसेच सत्तार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी आणि चुकीची माहिती देऊन निवडणूक विभागाची दिशाभूल केल्याचा आरोप करणारी याचिका सिल्लोडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं सत्तारांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली.

साडेपाचशे कोटींच्या निधीला स्थगिती…
सत्ता स्थापनेला हालचाली सुरू असतांनाच सत्तार यांच्या अडचणी वाढवणाऱ्या अनेक गोष्टी समोर येताहेत. 4 दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सत्तार यांच्या सिल्लोड सोयगयाव मतदारसंगात तब्बल साडेपाचशे कोटी रुपयांच्या भराडी निम्न प्रकल्पाला स्थगिती दिली.

बांग्लादेशात आणखी 2 हिंदू संतांना अटक, चिन्मय दासचे सचिवही बेपत्ता; इस्कॉन कोलकाता प्रवक्त्याचा मोठा दावा 

त्यातच 2011 ते 2019 या कालावधीत आमदार निधीचा गैरवापर करून स्वतःच्या संस्थेच्या शाळा खोल्या बांधल्याप्रकरणी कारवाईला विलंब का? अशी विचारणा करणारी नोटीस खंडपीठाने गृह विभागाला बजावली आहे. त्यामुळं सत्तार यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. या संदर्भात खंडपीठाने 12 डिसेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिलेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीने चांगलं यश मिळवलं. त्यामुळं महायुतीकडून पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. सत्तारही मुंबईत तळ ठोकून आहेत. मात्र, त्यांच्या विजयावर आरोप होत आहेत. तसेच त्यांच्याविरोधात याचिकाही दाखल करण्यात आल्यानं सत्तारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube