‘किमान तीन मुलं असावीत’, अन्यथा….; सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान

‘किमान तीन मुलं असावीत’, अन्यथा….; सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान

RSS Mohan Bhagwat Statement On Population Growth : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “लोकसंख्या घटणे ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की, जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) 2.1 च्या खाली जाते, तेव्हा कोणतीही समस्या नसली तरी तो समाज पृथ्वीवरून नाहीसा (Population Growth Rate Of Hindu) होतो. अशा प्रकारे अनेक भाषा आणि समाज नष्ट झाले.

मोहन भागवत पुढे म्हणाले की, लोकसंख्या 2.1 च्या खाली जाऊ नये. आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण 1998 किंवा 2002 मध्ये ठरले होते. पण कोणत्याही समाजाची लोकसंख्या 2.1 च्या खाली जाऊ नये, असंही त्यात म्हटलंय. मोहन भागवत पुढे म्हणाले, आपल्याला दोन-तीन मुलांची गरज आहे, ही संख्या महत्त्वाची आहे कारण समाज टिकला पाहिजे. नागपुरातील कठाळे कुलच्या बैठकीत मोहन भागवत यांनी लोकसंख्येबाबत ही चिंता व्यक्त केली.

EVM हॅक करू, 54 कोटी लागतील, व्हायरल व्हिडिओवर EC कडून स्पष्टीकरण, गुन्हाही दाखल

कुटुंब समाजाचा एक घटक आहे, समाजात कसं रहायचे हे व्यक्ती कुटुंबात शिकतो. लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगते की, लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला तर तो समाज नष्ट (Mohan Bhagwat Statement) होतो . सगळं जग, समाज सुरळीत चालावा, सर्व सुखी व्हावेत यासाठी जो असतो धारणा करणारा धर्म असल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलंय. शास्त्रात जात-पातीच्या भेदाला स्थान नसल्याचं देखील मोहन भागवत यांनी स्पष्ट केलंय.

‘उद्धव ठाकरे सोबत असते तर…’; सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

मोहन भागवत यांचं आजचं विधान समाजात लोकसंख्या धोरणाबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न आहे. परंतु मोहन भागवत यांनी केलेलं हे विधान चांगलंच चर्चेत आलंय. लोकसंख्येची संतुलित वाढ समाजाची स्थिरता आणि प्रगती सुनिश्चित करते, हा संदेश मोहन भागवत यांनी आजच्या भाषणातून दिलंय. लोकसंख्या वाढीचा दर कमी होतोय, हे सामाजित अन् सांस्कृतिक दृष्टिकोनातून हानिकारक ठरू शकते, असं देखील त्यांनी म्हटलंय. याचा आपल्या देशाच्या भविष्यावर परिणाम होवू शकतो, अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केलीय.

देशात भाजपचे अनेक नेते सध्या लोकसंख्या नियंत्रणाबाबत बोलत आहेत. अशावेळी मोहन भागवत यांचं हे विधान समोर आलंय. अशावेळी संघाचे प्रमुख राज्यातील घटत्या प्रजनन दराबद्दल चिंता व्यक्त करताना समोर आले आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी राजस्थानमधील भाजप आमदार बालमुकुंदाचार्य हे लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणण्याबाबत बोलले होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube