“पुण्या-मुंबईतील बंगले शोधून दाखवा… आता तुमच्या नावावर करतो” : काळेंच्या आरोपांवर बागडेंचे आव्हान!

“पुण्या-मुंबईतील बंगले शोधून दाखवा… आता तुमच्या नावावर करतो” : काळेंच्या आरोपांवर बागडेंचे आव्हान!

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी माझ्या नावावर असलेले मुंबई, पुण्यातले बंगले शोधून काढावे, ते मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असं म्हणतं भाजप आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau bagde) यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. आमदार म्हणून मला अडीच लाखांचे मासिक उत्पन्न मिळतं आणि त्यातच माझं घर चालतं, असंही बागडे म्हणाले. (BJP MLA Haribhau Bagde vs Congress Leader Kalyan Kale on Property issue)

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मतदार संपर्क अभियानानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषेदत काळे यांनी बागडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “माझ्या बापाने मी आमदार होण्यापूर्वीच मला बंगला बांधून दिला होता. त्याआधीपासून मी चार चाकी गाडीत फिरत होतो. हरिभाऊ बागडे आमदार झाले तेव्हा त्यांच्याकडे साधी मोटारसायकलही नव्हती.

उत्तर प्रदेश हादरलं! भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्यावर गोळीबार

मग आता संभाजीराजेसारखा कारखाना, छत्रपती संभाजीनगरमधील 4 बंगले, पुण्या-मुंबईतले बंगले अशी एवढी मोठी संपत्ती आली कुठून? जर ईडीला चौकशी करायची असेल तर हरिभाऊ बागडे यांचीच करायला पाहिजे. परमेश्वराने मला खात्यापित्या घरात जन्म दिला, यांच्यासारखं उपाशीपोटी घरात नाही दिला. एक रुपयाच्या भ्रष्टाचाराचे पाप मी केलेले नाही. खरे पापी तर हे आहे, असा हल्लाबोल कल्याण काळे यांनी केला होता.

Mahesh Manjrekarनी आकाशसाठी स्वतः बनवलं जेवण; लेकाच्या हॉटेलात रंगला बेत, Video Viral 

काळे यांच्या संपत्तीवरील आरोपांना उत्तर देताना बागडे म्हणाले की, मुंबईत मला फ्लॅट मिळाला होता, तो विकूनच मी शहरात घर आणि शॉपिंग कॉम्पलेक्स बांधले. गावाकडे असलेली माझी जमीन ही वडिलोपार्जित आहे. कल्याण काळेंनी आरोप करताना विचार करायला हवा.

माझ्याकडे संभाजीराजे साखर कारखान्याचे शेअर्स असून मी फक्त सभासद आहे, कारखान्याचा मालक नाही. तर कल्याण काळे ज्या घरात राहतात तो बंगला त्यांच्या वडिलांनी तो कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन असताना बांधला होता हे लक्षात ठेवायला हवे, असा टोलाही बागडे यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube