मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार? मराठवाड्याच्या राजधानीत कोण बाजी मारणार?

मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार? मराठवाड्याच्या राजधानीत कोण बाजी मारणार?

Aurangabad Lok Sabha Constituency : राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्यानंतर अनेक दिवस कोण कुणाच्या सोबत आहे हे लक्षात आलं नाही. अनेक ठिकाणी कायम एकमेकांसोबत काम करणारे एकमेकांचे कट्टर विरोधक झाले. तर, कट्टर विरोधत एकमेकांचे मित्र झाले. राजकारणात कुणीच कुणाचा मित्र किंवा शत्रू नसतो तशातलाच हा प्रकार. सध्या देशात लोकसभा सुरू आहे. पाच टप्पे पूर्ण झाले. यामध्ये अनेक लढती या लक्षवेधी ठरल्या. त्यातीलच एक लढत म्हणजे 2019 चं औरंगाबाद तर 2024 चं छत्रपती संभाजीनगर. येथे 2019 जे समिकरणं होत त्याच्या एकदम विरोधी समीकरण येथे होतं. त्यामुळे येथे कोण बाजी मारणार आणि कोणतं गणित कुणाच्या पथ्थ्यावर पडणार हा महत्वाचा मद्दा.

 

औरंगाबाद अन् उस्मानाबाद नावानेच लोकसभा निवडणूक : नामांतराची दखल घेण्यास आयोगाचा नकार

निसटता विजय मिळवला

राज्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद. (जिल्ह्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झालं असलं, तरी मतदारसंघाचं नाव अद्याप बदललेलं नाही) औरंगाबाद हा मतदारसंघ शिवसेना-भाजपा युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे येथून सलग चारवेळा निवडून आले आहेत. त्या अगोदर ते आमदारही राहिले आहेत. चंद्रकांत खैरे हे पाचव्यांदा लोकसभेत जातील अशी परिस्थिती असताना अचानक वार बदललं आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी बाजी मारली. मात्र, चर्चा झाली ती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची. खैरे यांचा पराभव जलील यांनी नाही तर जाधव यांनी केला हीच चर्चा राज्यभर झाली. कारण जवळपास तीन लाख मतं एकट्या जाधव यांना झाली अन् तिथेच खैरे यांच मताधिक्य घसरलं. आणि त्यामध्ये जलील यांनी निसटता विजय मिळवला.

 

मतविभाजनाचा फॅक्टर

वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम यांची युती होती. ‘जय भीम आणि जय मिम’ हा फॅक्टर महत्वाचा ठरला. कारण औरंगाबाद जिल्ह्यात दलित आणि मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. तसंच, डॉ. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे येथे वंचित बहुजन आघाडी हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यातूनच जलील हे खासदार झाले असं स्पष्ट चित्र येथे होतं. तसंच, औरंगाबादच्या निकालात मतविभाजनाचा फॅक्टर महत्त्वाचा ठरला. मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खासदारकीच्या मैदानात उडी घेतल्यानंतर याला चांगलीचं रंगत आली होती. त्यांनी आक्रमक प्रचार करत अखेर खैरे यांचा पराभव केला.

 

छ.संभाजीनगरमध्ये मतदानापूर्वी जोरदार राडा; एकमेकांच्या अंगावर जात मनसे अन् ठाकरे गट भिडले

मुख्य लढत झाली ती शिवसेना VS शिवसेना

यावेळी मात्र, या निवडणुकीत गणित वेगळी आहेत. कारण वंचितची आणि एआयएमआयएमची युती नाही, हर्षवर्धन जाधव निवडणुकीत होते पण चर्चेत नव्हते. वंचित वेगळी लढली त्याचा फटका जलील यांना बसून खैरे यांना फायदा होऊ शकतो. परंतु, फक्त खैरे यांनाच नाही तर भुमरे यांनाही होऊ शकतो. कारण येथे पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात दोन शिवसेना समोरासमोर आहेत. एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि दुसरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना. येथे महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे तर महायुतीकडून पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्यात लढत झाली. एआयएमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान हे मैदानात होते. येथे दुहेरी नाही तर चौरंगी लढत झाली. परंतु, गेल्यावेळी मोठं आव्हान असलेले जलील यावर्षी बॅफुटवर पडल्याचं दिसलं. येथे मुख्य लढत झाली ती शिवसेना VS शिवसेना अशीच.

 

अशी आहे मतदारसंघांची रचना 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात, औरंगाबाद पूर्व, गंगापूर, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, वैजापूर आणि कन्नड असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी औरंगाबाद पूर्व आणि गंगापूरमध्ये भाजप, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि वैजापूरमध्ये शिवसेना (शिंदे) तर कन्नडमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षांचे आमदार आहेत.

 

असं आहे मतांचं समीकरण

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3,89,042 मतं मिळाली होती, तर चंद्रकांत खैरेंना 3,84,550 मतं मिळाली होती. काँग्रेसचे नेते सुभाष झांबड यांना 91,789 आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 2,83,798 मतं मिळाली होती. तेव्हा जाधव यांनीच चंद्रकांत खैरे यांचं गणित बिघडवल्याचं बोललं जातं. यावेळीही लोकसभा निवडणुकीत मतविभाजन होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात साधारणपणे 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज