आपला दणकाच असा आहे! जरांगे पाटलांचा सरकारला इशारा अन् संदेश

  • Written By: Published:
आपला दणकाच असा आहे! जरांगे पाटलांचा सरकारला इशारा अन् संदेश

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Protest) मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांचे उपोषण सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यानंतरही हे आंदोलन थांबवण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यातच आता जरांगे पाटलांनी आफला दणकाच असा आहे असे म्हणत सरकारला इशारा आणि संदेश दिला आहे.

Maratha Revervation : मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मग पश्चिम महाराष्ट्रातल्यांनी घोडे मारले का? चव्हाणांचा सवाल

आमच्याविरोधात बोलणाऱ्यांना सोडत नाही
मराठा आरक्षणावरून राज्य सरकार आणि सर्व राजकीय पक्षांना इशारा देत जरांगे म्हणाले की, आमच्याविरोधात बोलणाऱ्यांना आम्ही सोडत नाही. आपला दणकाच असा असून, सत्तेत असणाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा असे सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केले आहे.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आमच्याविरोधात न बोलणाऱ्याला आम्ही विनाकारण लक्ष करत नाही. मग ती व्यक्ती कुणी का असेना. मात्र, सत्तेत असणाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा ही आमची मागणी असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

IND vs PAK : भारत-पाक महामुकाबला आज पुन्हा होणार; जाणून घ्या श्रीलंकेतील पावसाचा अंदाज

तर, मी त्यांच्यासमोर नतमस्तक होईल
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज (दि. 11) मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नसून, विरोध म्हणून या बैठकीला न जाता आमचा आक्रोश घेऊन या बैठकीला जावे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास मी त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन नाक घासण्यासही मागेपुढे पाहणार नाही.

Maratha Reservation : लाठीमारातील आंदोलकांची प्रकृती गंभीर; मुख्यमंत्री शिंदे करणार स्व खर्चातून उपचार

अजित पवारांना आवाहन
दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यास कमी पडल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर आता जरांगे यांनी अजितदादांना आवाहन केले आहे. आरक्षणाबाबत अजितदादांनी चार पाच पक्षांना एकत्र घेऊन हा विषय लावून धरण्याची मागणी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube