‘मी पाच वर्ष वाट बघणार नाही, जालन्यात राजकीय भूकंप कसे होतात तुम्ही पाहा…’; गोरंट्याल यांचे मोठे विधान

‘मी पाच वर्ष वाट बघणार नाही, जालन्यात राजकीय भूकंप कसे होतात तुम्ही पाहा…’; गोरंट्याल यांचे मोठे विधान

Kailas Gorantyal: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यामध्ये काँग्रेसच्याही (Congress) अनेक नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, जालन्यातून पराभूत झालेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आता पक्षांतराचे संकेत दिलेत. मी एकदा बोललो की बोललो, आता पाच वर्षे वाट बघणार नाही, जालन्यात (Jalna) राजकीय भूकंप कसे कसे येतात ते तुम्ही पाहा, असं विधान गोरंट्याल यांनी केलं.

नगर – मनमाड हा रस्ता संशोधनाचा विषय, आमदार सत्यजित तांबेंचा खोचक टोला 

जालन्यात आपल्याच लोकांनी आपला घात केल्याची खदखद देखील कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली.

कैलास गोरंट्याल यांचा शिंदे गटाच्या अर्जुन खोतकर यांनी पराभव केला. त्यानंतर गोरंट्याल यांनी काँग्रेसला राजीनामा देण्याचे संकेत दिले.आज खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतांना गोरंट्याल म्हणाले की, गोरंट्याल एकदा बोलला की बोलला. मी पाच वर्षे वाट पाहणार नाही… जालन्यात राजकीय भूकंप होणार. एकेक भूकंप कसा कसा होईल, हे सगळ्यांनाच समजेल. आगे आगे देखो होता है क्या, असं ते म्हणाले.

पुढं ते म्हणाले की, जालन्यात जास्त काम केलं तर लोक जाना म्हणतात. जिथं जिथं जास्त काम केलं तिथे माझ्या विरोधात फतवा निघाला. मतलब के है यार मगर, दिले के सब काले है… मौका मिलेही डसनेवाले है, किस में कितना जहर है हमको मालूम है. सबसे ज्यादा साप हमीने पाले है… जालन्यामध्ये अस्तिनचे साप खूप आहेत. यावेळी माझं झालं. पण, 2029 ला तुमचं होऊ नये म्हणून तुम्हाला सल्ला देतो, असं गोरंट्याल खासदार काळेंना उद्देशून म्हणाले.

दरम्यान, कैलास गोरंट्याल यांच्या ‘जालन्यात राजकीय भूकंप कसे होतात ते तुम्ही पाहा’ या विधानाचा नेमका अर्थ काय? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube