नगर – मनमाड हा रस्ता संशोधनाचा विषय, आमदार सत्यजित तांबेंचा खोचक टोला
अहिल्यानगर – ज्या व्यक्तींना खरंच संशोधन करायचं असेल त्यांनी नगर-मनमाड महामार्गाचे संशोधन करावे, अशी खोचक टीका विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली. ते आज अहिल्यानगरमध्ये बोलत होते.
पगार जिल्हा बँकेकडून अन् चाकरी दुसऱ्याची; राम सातपुतेंकडून थेट मोहिते पाटलांच्या पीएचे गौडबंगाल उघड
सत्यजित तांबे यांनी आज अहिल्यागरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. नगर-कोपरगाव महामार्गाबाबत विचारले असता ते तांबे म्हणाले, नगर-मनमाड हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे. आम्हाला संगमनेरला जायचं असेल तर आळ्यापाट्यावरून जावं लागलं. कारण, या रस्त्यावर सतत ट्रफिक असते. रस्त्याचं काम सुरू असतं. मात्र, दहा वर्षापासून हा रस्ता पूर्ण होतं नाही. आजवर अनेक मंत्री आले, अनेकांनी आश्वासनं दिले. काहींनी 1000 कोटी रुपयांचं टेंडर निघालं, असं जाहीर करून टाकलं. पण प्रत्यक्षात मात्र आज एक फुटंही काम झाल्याचं दिसत नाही, असं तांबे म्हणाले.
ते म्हणाले, आता पुन्हा एकदा गडकरी यांनी या रस्त्याला निधी सुद्धा जाहीर केला आहे. तरीही हा रस्ता होत नाही. खरंच एखाद्या विद्यार्थ्याला किंवा कोणाला संशोधन करायचे असेल तर त्यांनी खऱ्या अर्थाने नगर-मनमाड या महामार्गाचे संशोधन करावे, या रस्त्यावर एखाद्याने पीचडी केल्यावरच रस्त्याची वास्तविकता पुढं येईल, असं ते म्हणाले.
राम शिंदेंची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आल्यचानंतर त्यांचा अहिल्यानगर शहरात सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी पाठ फिरवली. यावर बोलतांना तांबे म्हणाले, हा पक्ष विरहित कार्यक्रम होता. आपल्या जिल्ह्याचा हा एक प्रकारे सन्मान होता. राम शिंदेंची सभापतीपदी निवड होणं ही जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून ही भूषणावह बाब आहे. त्यामुळं सत्कार सोहळ्याला सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहणे अपेक्षित होतं, असं तांबे म्हणाले.