MLC Election 2024 : “जयंत पाटलांचा पराभव वेदनादायक”; सत्यजित तांबेंना अतीव दुःख

MLC Election 2024 : “जयंत पाटलांचा पराभव वेदनादायक”; सत्यजित तांबेंना अतीव दुःख

Maharashtra MLC Elections 2024 : विधानपरिषदेचे निकाल आज जाहीर (Maharashtra MLC Elections 2024) झाले यामध्ये 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार मैदानात होते. यापैकी महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. मात्र यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला.

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा आजच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. पाटील विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

MLC Election : मातोश्रीपासून विधानभवनापर्यंत ठाकरेंचे राईट हॅन्ड नार्वेकरांनी बाजी मारली

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागून होते. लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तर महायुतीला काहीसा धक्का बसला होता. यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकून आले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

तांबे नेमकं काय म्हणाले?

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील साहेब यांचा आजच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. भाई जयंत पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल.

MLC Election 2024 : महायुतीचे जोरदार कमबॅक; सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

जयंत पाटलांना फक्त 12 मते

जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार होते. मात्र निवडणुकीच्या निकालात ते सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नव्हता. विजयासाठी जयंत पाटील यांना 23 संख्यापर्यंत पोहचायचं होतं. पण जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube