…तर आम्ही लगेच उपोषण सोडणार; ‘लेटस्अप मराठी’शी बोलताना लक्ष्मण हाकेंचा मोठा खुलासा
Laxman Hake Special Interview on Letsupp Marathi : सरकार संविधानाने दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन करत आहे. (Manoj Jarange) या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हणत अनेक नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. (Laxman Hake) हाके ओबीसी आरक्षण रक्षण या विषयासंदर्भाने उपोषणासाठी बसलेले आहेत. यावेळी त्यांच्याशी लेट्सअप मराठीने संपर्क केला असता त्यांनी संवाद साधला आहे. (OBC) यामध्ये त्यांनी शरद पवार, उद्धव ठाके मोठे नेते आहेत. त्यांच्या तालुका प्रतिनिधीनेही संपर्क केला नाही असंही ते म्हणाले आहेत.
फक्त 20 टक्के राहीले म्हणतात धक्कादायक! महावितरणच्या कर्मचाऱ्याला खांबाला बांधून मारहाण, सरपंचावर गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील म्हणाले आम्ही आता फक्त 20 टक्के बाहेर आहोत. आता जरांगे म्हणतात तेही लवकरच ओबीसीमध्ये जातील. मग हे सरकार संविधानिक पद्धतीने चाललं आहे की कोणत्या पद्धतीने सुर आहे असा प्रश्नही हाके यांनी उपस्थित केला आहे. सध्या 80 टक्के मराठा ओबीसीमध्ये आहेत असं जरांगे म्हणत असतील तर हे कसं होत आहे हे पाहिलं पाहीजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
आता शाहु फुले नाहीत
मराठा समाज जर मागासलेला असेल तर पुढारलेला कोण आहे असा प्रश्न करत माझी ओबीसी बांधवांना नम्र विनंती आहे की, आपल आरक्षण वाचवण्यासाठी फुले-शाहु आंबेडकर आता आपलं आरक्षण वाचवायला येणार नाहीत. आपल्यालाच लढा द्यावा लागणार आहे असं म्हणत हाके यांनी ओबीसी बांधवांना सोबत येण्याची साद घातली.
तर उपोषण सोडणार भुजबळांनी मराठा-ओबीसीत झुंज लावली, त्यांना काही दिवसांनी बैलाचं इंजेक्शन जरांगेंचे टीकास्त्र
आमची मागणी म्हणजे मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे सराकरने सांगाव. हे सांगण्यसाठी साधा आमदार जरी पाठवला आणि त्याने दिलेल्या उत्तरावर आमचं समाधान झालं तर आम्ही लगेच उपोषण सोडणार आहोत असंही हाके यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे सरकार आता काय निर्णय घेतय हे पाहण महत्वाचं आहे.