संभाजीनगरात CM शिंदेंना धक्का; उमेदवार ठरण्याआधीच भाजपात राजकीय भूकंप

संभाजीनगरात CM शिंदेंना धक्का; उमेदवार ठरण्याआधीच भाजपात राजकीय भूकंप

Lok Sabha Election : छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही महायुतीला उमेदवार निश्चित करता आलेला (Lok Sabha Election) नाही. महाविकास आघाडीने येथे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिले. अंबादास दानवे यांची नाराजीही घालवली. दुसरीकडे मात्र महायुतीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या मतदारसंघासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे नाव फायनल होत असतानाच महायुतीत राजकीय भूकंप झाला आहे. भाजपाच्या दहा माजी नगरसेवकांनी अपक्ष विनोद पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांना पत्र दिले.

Madha Loksabha : मोहिते पाटील अन् शरद पवारांची दिलजमाई; प्रविण गायकवाडांनी सांगितलं A To Z

छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदे गटाला मिळणार आहे. या मतदारसंघात पालकमंत्री संदिपान भुमरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भुमरे पैठणचे आमदार आहेत. या भागातील मोठं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. परंतु, येथे त्यांना मोठा विरोधही आहे. आता हाच विरोध निवडणुकांच्या तोंडावर समोर आला आहे. या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. माजी खासदार चंंद्रकांंत खैरे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. तर एमआयएमने विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनाच पुन्हा संधी दिली आहे.

तसेच माजी आमदार हर्षवर्धन जाधवही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अशा परिस्थितीत महायुतीचा तगडा उमेदवार म्हणून भुमरे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या नावावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. परंतु, उमेदवारी त्यांनाच निश्चित मानली जात आहे. अशातच त्यांच्या उमेदवारीवरून भाजपात असंतोष उफाळून आला आहे.

Loksabha Election : माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला; अर्चना पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं

भुमरेंच्या संभाव्य उमेदवारीविरोधात स्थानिक भाजप नेत्यांनी आवाज उठवला आहे. दहा नगरसेवकांनी अपक्ष उमेदवार विनोद पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच भाजपा शहराध्यक्ष बोराळकरांना पत्र पाठवत भुमरे उमेदवार नको असा संदेश दिला आहे. भाजपाचे माजी उपमहापौरांसह अन्य नेत्यांचा यात समावेश आहे. भाजपाच्या या विरोधावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीत हे बसणाररे नाही असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेनंतर या मतदारसंघावरील भाजपाचा दावा मवाळ झाला. आता भुमरेच उमेदवार असतील असे सांगण्यात येत आहे. परंतु, त्यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच विरोध सुरू झाला आहे. याआधीही भाजप नेत्यांनी विनोद पाटील यांना उमेदवारी द्या अशी मागणी केली होती. यानंतर आता पुन्हा विरोध वाढू लागला आहे. यावर महायुतीचे नेते काय तोडगा काढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube