बायकोसाठी आमदार पतीची निवडणुकीतूनच माघार; सख्ख्या बहिण भावांत होणार सामना

बायकोसाठी आमदार पतीची निवडणुकीतूनच माघार; सख्ख्या बहिण भावांत होणार सामना

Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी अर्ज दाखल (Maharashtra Elections 2024) झाले आहेत. आता माघार घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. नाराजी उफाळून आली आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून दुसऱ्या पक्षातून काही जणांनी तिकीट मिळवलं आहे. तर काही जणांनी  (Nanded News) थेट अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे.  या बंडखोरांची मनधरणी करण्याची मोहिम सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे अशाही खास घडामोडी घडत आहेत ज्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघाची चर्चा राज्यभरात होत आहे.

या मतदारसंघात एका विद्यमान आमदाराने आपल्या पत्नीसाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या या त्यागाची मोठी चर्चा होत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघात माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांची पत्नी संजना जाधव यांच्यात लढत होत आहे. त्यापेक्षा लोहा मतदारसंघात हा अतिशय वेगळाच प्रसंग घडला आहे.

कन्नड मतदारसंघात पतीविरुद्ध पत्नी रंगणार सामना; हर्षवर्धन जाधवांनी सासरे दानवेंना घेरले !

या मतदारसंघात माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी त्यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याविरोधात आशा शिंदे या शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत श्यामसुंदर शिंदे यांनी एक लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. आमदार शिंदे हे प्रताप पाटील चिखलीकर याचे दाजी आहेत. या मतदारसंघात निवडणूक लढण्याची घोषणा आशा शिंदे यांनी केली होती.

शेकापने श्यामसुंदर शिंदे आणि त्यांची पत्नी आशा शिंदे या दोघांनाही एबी फॉर्म दिले होते. दोघांनीही अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या दोघांपैकी कोण उमेदवार असणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यानंतर श्यामसुंदर शिंदे यांनी पत्नीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची होईल अशी शक्यता आहे. या मतदारसंघात माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आशा शिंदे, ठाकरे गटाचे एकनाथ पवार, वंचित बहुजन आघाडीचे शिवा नरंगले, प्रा. मनोहर धोंडे या प्रमुख उमेदवारासंह अन्य उमेदवार रिंगणात आहेत.

माजी खासदार चिखलीकरांच्या हाती घड्याळ; माजी मुख्यमंत्र्यांना पाडणाऱ्या नेत्याचा भाजपाला रामराम

follow us
  • fb
  • instagram
  • youtube