तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनंतर मंत्र्यांचीही नांदेड वारी; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला दिला ‘हा’ इशारा

तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनंतर मंत्र्यांचीही नांदेड वारी; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला दिला ‘हा’ इशारा

Nanded News : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. मागच्याच महिन्यात ते नांदेडमध्ये (Nanded) आले होते. येथे त्यांनी चाचपणी करत जाहीर सभा घेतली. अनेकांचा पक्ष प्रवेश घडवून आणला. येथे आपली राजकीय जमीन करण्याच्या प्रयत्नात केसीआर यांचे मंत्रीही उतरले आहेत. राव यांच्यानंतर आता त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी नांदेड दौरा सुरू केला आहे.

सोमय्यांची अनेक लफडी, ईडीकडूनच त्यांना मिळते कमिशन; चंद्रकांत खैरेंचे गंभीर आरोप

तेलंगाणा सरकारमधील वनमंत्री इंद्रकरण रेड्डी व किनवट-माहूर विधानसभेचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते किनवट तालुक्यातील (जि. नांदेड) दयाळ धानोरा येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य श्री संत रामराव महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

ईडीला कोर्टात खेचणार, जेलभरो आंदोलन करणार; छापेमारीच्या टायमिंगवर अंधारे भडकल्या

यावेळी रेड्डी म्हणाले, नांदेडमध्ये बीआरएस पार्टीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री राव यांनी शेतकऱ्यांविषयी व मजूरांविषयी ज्या काही घोषणा केल्या होत्या त्याच घोषणाची कॉपी करून महाराष्ट्र सरकारने आर्थिक बजेट घोषित केले आहे.  कॉपी करायचेच असेल तर पूर्ण कॉपी करा ना अर्धे का करता. तेलंगाणा सरकारने शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील सरकार मात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देणार आहे. असे चालणार नाही. शेतकरी आता प्रश्न विचारू लागले आहेत, की जर शेजारच्या तेलंगाणा राज्यात होऊ शकते तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही तेव्हा आता महाराष्ट्र सरकारने याचा विचार करण्याची गरज आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube