Maratha Reservation : मी, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा नाही मोडत; भुजबळांचा जालन्यातून जरांगेंवर हल्लाबोल

Maratha Reservation : मी, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा नाही मोडत; भुजबळांचा जालन्यातून जरांगेंवर हल्लाबोल

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. मात्र मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. तो विरोध दर्शवण्यासाठी आज ओबीसी समाज एकवटला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मेळावा घेतला आहे. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

छगन भुजबळ यांचा जरांगेंवर हल्लाबोल…

मराठा आरक्षणाला विरोध करताना गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये एकमेकांवर टीका टीपण्णी सुरू आहे. त्यात आता या जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मेळावा घेतला आहे. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

शिवाजीराव आढळराव पाटील शिंदेंची साथ सोडणार, अजित पवार गटात करणार प्रवेश?

ते म्हणाले की, जरांगे मला विचारतात की, मी कुणाचं खातो? अरे मी काय तुझं खातो का? हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही. असे छगन भुजबळ म्हणाले. तेसेच ते पुढे म्हणाले की, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये. 56 मराठी मोर्चे पण आम्ही कुणालाही विरोध केला नाही. तसेच आम्ही कुणाची घरं दारं देखील जाळली नाहीत.

Murderwale Kulkarni: वैभव अन् संतोषची जोडी जमली, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज

ओबीसी आरक्षणावर प्रश्न उपस्थित करता पण ओबीसीतील सर्व जाती या कायद्याने आल्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला गरिबी हटाव मोहिमेसारखी वागणूक देऊ नका. तसेच मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये अवैधरित्या घुसतो आहे. असे छगन भुजबळ म्हणाले. ईडब्लूएसमध्ये मराठा समाजाला जो लाभ मिळाला तो ओबीसींना देखील मिळालेला नाही. मराठा समाजाला 10-11 कोटी मिळतात. मात्र ओबीसी समाजाला हजार कोटी मिळत नाहीत तर मराठा समाज 85 टक्के मराठा समाज ईडब्लूएसचा लाभ घेतोय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube