Video : विरोधकांकडं लक्ष देऊ नका, 20 हजार कोटींमधील 14 हजार कोटी नुकसानग्रस्तांच्या खात्यावर, आमदार राणा पाटील यांची माहिती

आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना जिल्ह्याची माहिती नाही. ते काहीतरी गैरसमज पसरवत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्ष देऊ नये.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 06T194407.409

यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Dharashiv) जिल्ह्यातील शेतकर्यांसना महायुती सरकारने साधारण 20 हजार कोटी देण्याचं जाहीर केलं होत. यातील सुमारे 14 हजार कोटी आजवर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधक जे करतात ते आरोप चुकीचे आहेत असा थेट आरोप तुळजापुरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे.

त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात सोळाशे रुपये रुपये येण अपक्षीत आहेत, त्यापैकी बाराशे कोटी रुपये आले आहेत. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. त्यामुळे विरोधकांनी चुकीच्या गोष्टी जरी पसरवल्या तरी वास्तव वेगळ आहे असंही पाटील यावेळी म्हणाले आहेत. अडचणीच्या काळात असलेल्या शेतकऱ्यांना महायुती सरकारने दिलेल्या अनुदान आणि मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचंही ते म्हणाले.

अतिवृष्टीग्रस्तांना 1278 अनुदान वितरीत; आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी दिली माहिती

आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना जिल्ह्याची माहिती नाही. ते काहीतरी गैरसमज पसरवत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना मला हे सांगायचं आहे की, एनडीआरएफचे निकष किंवा केंद्राची मदत हे होईल किंवा नाही याचा विचार न करता महायुती सरकारने आपल्याला मदत केली आहे असंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे विरोधातील लोकप्रतिनिधी काय म्हणत आहेत त्याकडं कुणी लक्ष देऊ नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

पीक विमा खरीप 2025 संबंधित प्रक्रिया सुरू असून पिक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा कंपनीने नोंदविलेल्या आक्षेपांवर जिल्हाधिकारी स्तरावर सुनावणीची कार्यवाही सुरू आहे. सुनावणी संपल्यानंतर शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरणाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली. शासन व प्रशासनासोबत शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

follow us