मराठवाडा अन् विदर्भासाठी आनंदाची बातमी! छत्रपती संभाजीनगर ते नागपूर विमानसेवा लवकरच सुरू

मराठवाडा अन् विदर्भासाठी आनंदाची बातमी! छत्रपती संभाजीनगर ते नागपूर विमानसेवा लवकरच सुरू

Nagpur Chhatrapati Sambhajinagar Airline : विदर्भतील लोकांसाठी मोठी बातमी आहे. कारण नागपूर ते मराठवाडा ही विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Airline ) ही विमानसेवा नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू आहे. (Nagpur) त्यानंतर काही तासांचं अंतर मिनिटांव येईल. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दोन प्रदेश अधिक जवळ   कावेरी पाणी प्रश्न पेटला: बंगळुरूमध्ये विमानसेवा विस्कळीत, 44 उड्डाणे रद्द

नागपूर ते नांदेड विमानसेवा २७ जूनपासून स्टार एअरची सेवा सुरू होणार आहे. ही विमानसेवा सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार अशी चार दिवस असणार आहे. तेच नागपूर ते छत्रपती संभाजीनगर इंडिगो एअरलाईन्स विमानसेवा 2 जुलैपासून सुरू होणार आहे. ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस असणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शहरांदरम्यान विमानसेवा सुरू होत असल्यामुळे हे दोन प्रदेश अधिक जवळ येत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

 अंतर काही मिनीटांत पार होणार अहमदनगरचे खासदार कुख्यात गुंडाच्या घरी; गजा मारणेकडून सत्कार, लंके वादात भोवऱ्यात

नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशातील अतिशय महत्वाची आर्थिक केंद्र आहेत. या दोन्ही शहरांदरम्यान रोज मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. त्यासाठी नागपूर ते छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी ट्रॅव्हल्सचा उपयोग होत असल्याचं पाहायला मिळतं. या दोन शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी किमान बारा आणि किंवा त्यापेक्षाही जास्त तास लागतात. परंतु, ही विमानसेवा सुरू होत असल्याने आता हे अंतर काही मिनीटांत पार होणार आहे.

 नांदेड ते नागपूर

छत्रपती संभाजीनगर ते नागपूर अशी थेट रेल्वेसेवा नाही. त्यामुळे थोड्या रेल्वे छत्रपती संभाजीनगर येथे थांबतात. त्यामुळे असा प्रवास करणं जास्त कठीण आणि वेळखाऊ आहे. या प्रवासात खासगी ट्रॅव्हल्सपेक्षाही जास्त वेळ जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सने रात्रीच्या वेळी प्रवास करताना दिसत आहे. परंतु, आता या सर्व समस्या सुटणार आहेत. कारण विमानसेवा सुरू होत आहे. नांदेड ते नागपूर ५० मिनिट आणि नागपूर ते छत्रपती संभाजीनगर प्रवास केवळ अवघ्या १ तासात पूर्ण होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज