आमदार धसांविरोधात आंदोलन; प्राणघातक हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते राम खाडेंचा आक्रमक पवित्रा…
राष्ट्रवादीचे नेते राम खाडे हल्ल्याच्या घटनेनंतर आमदार सुरेश धस आणि पोलिस प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आलीयं.
Ram Khade News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राम खाडे (Ram Khade) यांच्यावर काही दिवसांपूर्वीच जीवघेणा हल्ला झाल्याच प्रकार घडला. या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतही आरोपी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह इतर 12 आरोपींवर कारवाई करण्यास पोलिसांकडून दिरंगाई होत आहे. सदरील प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात राष्ट्रवादीचे नेते राम खाडे पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती खाडे यांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे निवेदनाद्वारे दिलीय. येत्या 29 डिसेंबरपासून खाडे यांनी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
मराठी, मराठी करता आम्ही काय लंडनहून आलोयं का? ठाकरे बंधूंच्या युतीवरुन बावनकुळे संतापले..
राम खाडे आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेत आहेत. खाडे यांच्यावर दि. 26 नोव्हें.2025 कर्जत तालुक्यातील मांदळी येथील एका हाटेलवर 10 ते 12 हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर उपचारार्थ खाडे पुण्यातील रुग्णालयात दाखल झाले. या हल्ल्यानंतर खाडे यांच्या जबाबानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर तो अहिल्यानगर पोलिसांकडे वर्ग झाला. हल्ल्याच्या घटनेनंतर 28 दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक करण्यात न आल्याने या गुन्ह्याचे तपासी अधिकारी अर्थिक तडजोडी करत असल्याचा आरोप राम खाडे यांनी केलायं.
ईशान्य भारतात हिंसाचार! आसामच्या आंगलोंगमध्ये आंदोलन चिघळलं, परिसरात कर्फ्यू लागू
खाडे यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवदेनात म्हटले की, आमदार सुरेश धस यांनी पोलिस प्रशासन मॅनेज केले असून त्यामुळेच पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांनी कटकारस्थान करुन सुपारी देऊन 10 ते 12 हल्लेखोरांना पाठवून प्राणघातक हल्ला घडवून आणल्याचा आरोप राम खाडे यांनी केला आहे. हल्ल्याच्या घटनेला 28 दिवस होऊनसुद्धा अद्याप आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्या पतीचा जीव धोक्यात असून आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी राम खाडे यांच्या पत्नी तुळसा राम खाडे यांनी निवदेनात केलीयं.
नेमकं काय घडलं होतं?
राम खाडे हे अहिल्यानगर येथून आष्टीकडे येत होते. मांदळी गावाजवळील हॉटेलसमोर त्यांची गाडी थांबताच, अचानक दहा ते बारा जण रागाने त्यांच्या दिशेने धावून आली आणि लाठ्या-कोयत्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हल्ल्याच्या वेळी खाडे यांच्या सोबत दोन ते तीन साथीदार होते. या सर्वांवरही मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
भाजपत मुनगंटीवार एकनाथ खडसेंची पुनरावृत्ती करणार की देवेंद्रंना शह देणार? राजकीय वर्तुळात खळबळ…
दरम्यान, पोलिस कर्मचारी आणि तपासी अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मदत होत असल्यानेच आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. पोलिस प्रशासनाने निपक्षपातीपणाने या हल्ल्याच्या घटनेचा तपास करुन आरोपींवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी राम खाडे यांच्यासह कुटुंबिय, आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धरणे आंदोलन करणार आहेत.
