आम्ही MLA धसांचे कार्यकर्ते…; 12 हजारांसाठी तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण, आरोपी मोकाट

Beed Crime : शिरूर तालुक्यातील नागऱ्याची वाडी या गावात केवळ १२ हजार रुपयांच्या कारणावरून एका तरुणाचं अपहरण करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शिवाजी शिंदे (Shivaji Shinde) असं पीडित तरुणाचे नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप आरोपींवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. विशेष बाब म्हणजे, मारहाण करणाऱ्या आरोपींनी स्वतःला भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांचे समर्थक असल्याचं म्हटलं. दरम्यान, या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ब्रेकिंग! 25 ऑगस्ट ‘वराह जयंती उत्सव दिन’ म्हणून घोषित करा; नितेश राणेंचे थेट CM फडणवीसांना पत्र
प्राप्त माहितीनुसार, १२,००० रुपयांच्या वादातून शिवाजी शिंदे या तरुणाचे अपहरण करण्यात आले. पीडिताला त्याच्या घरातून उचलून हनुमान मंदिराजवळील परिसरात नेण्यात आलं. तिथं त्याला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करण्यात आली होती. मारहाणीमागील हेतू त्याला मारण्याचा होता, असा आरोप पीडिताने केल आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोपींवर तात्काळ कारवाई करा…
या मारहाणीबाबत शिवाजी शिंदे यांनी सांगितलं की, आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्यामुळे माझ्या जीवाला सतत धोका आहे. उद्या मला काही झाले तर त्यासाठी हेच लोक जबाबदार असतील. तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी शिंदेंनी केली.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी स्वत:ला भाजप आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते असल्याचं सांगत धमकावल्याचा दावा पीडिताने केला आहे. शिंदे म्हणाले, मला मारहाण करताना त्यांनी आमदार सुरेश धस यांचे नाव घेतले आणि आम्ही धसांचे कार्यकर्ते आहोत, आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही, असं म्हणत माझ्यावर हल्ला केला. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, आमदार सुरेश धस हे अशा कोणत्याही गोष्टीला प्रोत्साहन देणार नाहीत. परंतु त्यांच्या नावाचा वापर कूरन चुकीच्या कृत्ये करणाऱ्या लोकांना थारा मिळू नये.
दरम्यान, या प्रकरणी शिवाजी शिंदे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून अद्यापही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे आरोपी मोकाट असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.