‘कोण कुणाला कोंडीत पकडतंय हे काळच ठरवेल’; धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे?

‘कोण कुणाला कोंडीत पकडतंय हे काळच ठरवेल’; धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीची चर्चा अजूनही सुरुच आहे. या भेटीवर दोघांनीही प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी चर्चा काही थांबलेल्या नाहीत.आता तर खुद्द शरद पवारच सत्तेत सहभागी होणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्या (17 ऑगस्ट) शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली.

शरद पवार यांची बीडमधील जाहीर सभा म्हणजे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कोंडीत पकडण्याची खेळी असल्याचे बोलले जात आहे. या सभेआधी मंत्री मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सभेबाबत त्यांना विचारले असता मुंडे म्हणाल, एक गोष्ट लक्षात घ्या, कोण कुणाला कोंडीत पकडतंय हे येणारा काळच ठरवेल. तुर्तास सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, असे सूचक उत्तर मुंडे यांनी दिले.

‘इतकं क्रूर सरकार अन् राजकारण आम्ही पाहिलं नाही’; मणिपूरवरून राऊतांची पुन्हा आगपाखड

अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे पक्ष बांधणीसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांच्याकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. आता अशीच सभा उद्या बीडमध्ये होत आहे. या सभेतून पवार काय फटकेबाजी करणार, कुणाला निशाण्यावर घेणार याची उत्सुकता आहे. सभा अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या होम ग्राउंडमध्ये होत आहे म्हटल्यानंतर या सभेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंचीही कोंडी करण्याचा शरद पवार गटाचा उद्देश लपून राहत नाही. त्यामुळे शरद पवार या सभेतून धनंजय मुंडे यांच्यावर काय टीका करतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube