वाल्मीक कराडची शरणागती, विरोधक सरकारवर तुटून पडले..

वाल्मीक कराडची शरणागती, विरोधक सरकारवर तुटून पडले..

Beed Crime : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे राज्यभरात अत्यंत संतप्त पडसाद उमटले होते. या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाही निघाला होता. या घडामोडीनंतर आज एक आणखी मोठी घडामोड घडली. फरार असलेला वाल्मीक कराड आज सीआयडीला शरण आला. यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मीक कराडवर जर खंडणीचा गुन्हा होत तर त्याने याआधीच आत्मसमर्पण करायला हवं होतं असे खासदार सोनवणे म्हणाले आहेत.

आधी व्हिडीओ बनवला, मग शरण गेला.. वाल्मिक कराडच्या सरेंडरची स्टोरी

सोनवणे पुढे म्हणाले, मी माझ्या नियोजित कार्यक्रमांमध्ये व्यस्त होतो. प्रसारमाध्यमांतूनच मला ही माहिती मिळाली. आता वाल्मीक कराडला कोणत्या गुन्ह्यात अटक करायची याचा निर्णय पोलिसांनी घ्यायचा आहे. 9 तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या घटनेला 22 दिवस उलटून गेले. जर वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा होता तर मग त्याने आधीच आत्मसमर्पण करायला हवं होतं. सीआयडीसमोर आता त्याने स्वतःला सरेंडर केलं आहे.

मुंडे-फडणवीस भेटीने शंका : भास्कर जाधव

दरम्यान, काल धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. दोघांत सह्याद्री अतिथीगृहावर बराच वेळ चर्चा झाली होती. त्यानंतर आज लगेच वाल्मीक कराड शरण आल्याने वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. विरोधकांनी या भेटीवर संशय व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही यावर संशय व्यक्त केला आहे.

आजच पेपरमध्य वाचलं की काल मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. काल त्यांनी चर्चा केली आणि आज वाल्मीक कराड शरण व्हावा, हा योगायोग म्हणावा की पोलिसांच्या हाताला न लागताच तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का, अशी शंका राज्यातील जनतेच्या मनात येत आहे असे भास्कर जाधव म्हणाले आहेत.

मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय? वाल्मिक कराडच्या सरेंडरनंतर संतोष देशमुखांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया

follow us
  • fb
  • instagram
  • youtube