नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस […]
बीड : जिल्ह्यातील काका पुतण्याच्या लढतीत पुन्हा पुतण्यानं बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वादानंतर बीड तालुक्यातील नवगण राजुरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच गटाला झुकतं माप दिलंय. ग्रामपंचायत निवडणूक निकालात आज संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविलाय. जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी अधिराज्य असलेल्या दिवंगत लोकनेत्या […]
बीड : परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादीने सर्वाधिक 28 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाला फक्त 12 ठिकाणी विजय मिळवता आल्याचं पाहायला मिळतंय. परळी विधानसभा मतदारसंघातसर बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आमदार धनंजय […]
औरंगाबाद : जिल्ह्यात 208 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होते. आज सकाळी आकरा वाजता ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरवात झाली. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. पैठण तालुक्यातील शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची बनलेली बिडकीन ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे. आता वैजापूर तालुक्यातील महालगावची ग्रामपंचायत देखील ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे. शिंदे गटाचे आमदार रमेश […]
नांदेड : नांदेडमध्ये भाजपकडून पाकिस्तान आणि परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळण्यात आला. तर पुतळा जाळताना भडका उडाल्याने खासदार प्रताप चिखलीकर यांचा हात भाजला आहे. यावेळी जवळ असलेल्या कार्यकर्त्याने प्रसंगावधान दाखवत तात्काळ आग विझवली. यामध्ये चिखलीकरांचा हात किरकोळ भाजला. गेल्या काही दिवसांपुर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल […]