आज हे माल लुटणारे जेलमध्ये आहेत, मोदींचा भ्रष्टाचारावरून विरोधकांवर घणाघात
PM Narendra Modi Sabha In Latur : लोकसभेच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा मोठा धडाका सुरू आहे. दोन दिवसांपासून मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांच्या सोलापूर, सातारा आणि पुणे अशा तीन ठिकाणी प्रचारसभा झाल्या. तर, आजही मोदींनी तीन सभांना संबोधित केलं. माढा, लातुल अशा ठिकाणी मोदींच्या जाहीर सभा झाल्या. लातुरमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाना साधला.
काँग्रेस संपत्ती वाटणार
यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर संपत्तीबाबत आरोप केले आहेत. आपण आपल्या उतार वयात किंवा आपल्या निधनानंतर आपली संपत्ती आपल्या वारसाला देतो. तसंच, तशा पद्धतीची सोय करतो. परंतु, काँग्रेस आता तुमची पूर्ण संपत्ती तुमच्या पुढील वारसाला देणार नसून, ती त्यामधील अर्धी संपत्ती दुसऱ्याला देण्यासंदर्भात कायदा करणार आहे असा थेट आरोप मोदींनी यावेळी केला आहे.
तीसरी अर्थव्यवस्था होणार
यावेळी मोदी म्हणाले, पूर्वी रेल्वेत बॉम्ब ब्लास्ट, मुंबईत बॉम्ब ल्बास्ट अशा घटना घडत होत्या. परंतु, आमचं सरकार आल्यानंतर या घटना बंद झाल्या असून देशाच्या सीमावरही सुरेक्षेच्या पातळीवर मोठी सुधारणा आम्ही केली आहे असा दावाही मोदींनी यावेळी केला. तसंच, याचबरोबर 2024 ला भारत जगातील तीसरी अर्थव्यवस्था होईल असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.
या गोष्टी बंद करण्यासाठीच बसलोय
यावेळी मोदींनी भ्रष्टाचारावरूनही टीका केली आहे. मोदी म्हणाले, आज इथ रेड टाकली, यांच्याकडे ईडीचा छापा, दोन करोड सापडले. घरात कॅश सापडली. हजार कोटी मिळाले अशा बातम्या येतात की नाही? असा प्रश्न विचारत मोदींनी भ्रष्टाचारावरून विरोधकांवर घणाघाती टीका केली. त्याचबरोबर मला तुम्ही इथं कशाला बसवलयं? असं म्हणत या गोष्टी बंद करण्यासाठीच मी बसलोय असंही मोदी यावेळी म्हणाले.