‘तुम्ही पातळी सोडली म्हणूनच..,’; शेलारांच्या इशाऱ्याला दानवेंचं जोरदार प्रत्युत्तर
तुम्ही पातळी सोडली म्हणूनच आम्हाला बोलावं लागतयं, लक्षात ठेवा ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी, या शब्दांत ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करीत टीका केली होती. त्यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी इशारा दिला होता. याच इशाऱ्याला अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्यातील तरुणांपेक्षा ठाकरेंना त्यांच्या मुलाच्या भविष्याची चिंता : बावनकुळेंचा टोला
दानवे म्हणाले, तुम्ही सगळी पातळी सोडलेली आहे म्हणूनच आम्हाला बोलावं लागतंय, लक्षात ठेवा ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी, त्यामुळे कुठपर्यंत जायचं त्याची पातळी आम्हालाही माहिती आहे. मर्यादा सांभाळलेल्या बऱ्या, असं अंबादांस दानवे म्हणाले आहेत.
“PM मोदींचा एक फोन येऊ द्या, आरक्षणाचा जीआर घेऊन…” : जरांगे पाटलांचं मोठं विधान
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
मी घराणेशाहीचा पाईक आहे. जो कुटुंबव्यवस्था मानत नाही त्याने दुसऱ्याच्या कुटुंबावर बोलू नये. आधी कुटुंब व्यवस्था मान मग हिंदुत्वावर बोल कारण कुटुंबव्यवस्था हा हिंदु संस्कृतीचा पाया आहे, तो तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही आमच्यावर बोलणारे कोण आहात? अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती.
‘आम्हीच आग आम्हीच भिंत, छाटू तुमचे पंख’; शेरोशायरी करीत दानवेंनी शिंदे गटाला ललकारलं
आशिष शेलार म्हणाले :
यापुढे पतंप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करु नका, आज विनंती करतोयं नाहीतर पुढील काळात भाजपच्या लोकांनी तुमचा सडेतोड अपमान केला तर वाईट वाटून घेऊ नका. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात आणि ते झालेच पाहिजे.
World Cup 2023 : पाकिस्तानच्या पराभवानंतर अफगाणिस्तानची ‘झेप’; गतविजेता संघ तळाला
आम्ही पातळीला पातळीनेच उत्तर देऊ, खालच्या पातळीवर उद्धव ठाकरे बोलाल तर त्याच पातळीवर भाजपचा नेता तुम्हाला उत्तर देईल. मग वाईट वाटले बोलू नका, असा इशारा शेलारांनी दिला होता.
‘धोरण आखले आहे’! दसऱ्याच्या मुहुर्तावर सीमोल्लंघन करत शिंदे सरकार देणार जरांगेंना मोठं गिफ्ट?
दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यातून दोन्ही गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्याने भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्यावर रोख धरण्यात आला आहे.