छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये तीन जण जागीच ठार झालेय. तर दोन जण गंभीर स्वरूपात जखमी आहेत. शहरतील सिल्लोड रोडवर मध्यरात्री ही घटना घडली. (Accident) सध्या पोलीस या प्रकारणाचा अधिक तपास करत आहेत. कार भरधाव वेगात होती. त्यामुळं चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार डिव्हायडरला जाऊन धडकली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हे सर्व पाचही मित्र एका धाब्यावर जेवणासाठी फुलंब्रीला गेले होते. दरम्यान, परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. भरधाव कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याने कारमधील तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. तर, दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमी तरुणांना नाना घाटीमध्ये दाखल. धक्कादायक बाब म्हणजे कारमधील सर्व तरुण 15 ते 18 वर्षांचे होते. सध्या पोलीस या अपघातचा तपास करत आहेत. जखमी तरुणांना नाना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संतोष लड्डा दरोडा प्रकरण; 22 तोळे सोनं अन् जिवंत काडतूसे सापडले; अमोल खोतकरच्या बहिणीला अटक

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथून एमडी ड्रग्स तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन वाहने जप्त करून दोन गोदामे सील केली असून तब्बल १ कोटी २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून मिळालेली ‘व्हीआयपी’ वागणूक सध्या चांगलीच वादग्रस्त ठरत आहे.

दरम्यान, 24 जूनच्या रात्री बबनभाईला वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका हॉलमध्ये टेबलावर बसवून, फॅनच्या थंड हवेत, कुटुंबासोबत जेवणाची विशेष व्यवस्था केल्याचं या फोटो मधून दिसते आहे. गुप्त माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी मुख्य आरोपीला इतकी सवलत दिली जात असल्याने कारवाईची पारदर्शकता आणि पोलिसांची निष्ठा याबाबत शंका उपस्थित होत आहे. राजकीय दबाव किंवा आर्थिक व्यवहार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube