वसंतदादा कुठे आणि आता त्यांचे वारसदार कुठे…; भुजबळांचा विशाल पाटलांवर निशाणा
Chhagan Bhujbal On Vishal Patil: सांगलीती ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा (OBC Mahaelgar Meeting) झाला. या मेळाव्याला खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी विरोध केला होता. त्यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सांगलीचे वसंतदाद कुठे आणि त्यांचे वारसदार कुठे, अशा शब्दात त्यांनी विशाल पाटील यांच्यावर टीका केली.
‘आजीबाई जोरात’ नाट्याची रसिकांमध्ये क्रेझ, ‘या’ दिवशी पुण्यात होणार सुवर्ण महोत्सवी प्रयोग
आज सांगलीत ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा झाला. या मेळाव्याला प्रा. लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर आदी नेते उपस्थित होत. यावेळी सभेला संबोधित करतांना भुजबळ म्हणाले की, सांगली जिल्हा हा क्रांतीकारकांचा जिल्हा, कलाकारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याने अनेक मोठे नेते दिले. वसंतदादा पाटलांसारख्या या भागातील नेत्याने बराच काळ महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. ते मुख्यमंत्री होते, तेव्हा मी नगरसेवक होते. आपली काम घेऊन सांगलीवरून लोक त्यांना भेटायला जायचे. त्यांना भेटायला जाणाऱ्यात एखादा शेतामजूरही असायचा. दादाला भेटायला गेल्यावर उघडा बोडका शेतमजूर पाहून दादा म्हणायचे, अरे कमीज कुठंय? त्याच्या अंगावर कमीज नाही हे पाहून दादा त्याला आपला कमीज द्यायचे, असं भुजबळ म्हणाले.
पुढं ते म्हणाले, ते वसंतदादा कुठं आणि आताचीही मंडळी, त्यांचे वारसदार कुठं. आताची मंडळी म्हणते की, रॅली इथं कशाला? अरे आपल्या वाडवडिलांनी सर्वांना सोबत घेतलं, गोरगरिबांना सोबत घेतलं, त्याची तरी जाण ठेवा, असा म्हणत आम्ही तुमची खासदारी घ्यायला आलो नाही, असं भुजबळ म्हणाले.
महायुतीचं सरकार आहे. मी तुम्हाला नक्की सांगतो. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही. ओबीसींना आरक्षण दिले जाणार नाही. चार आयोगांनी हे शक्य नसल्याचे म्हटलं. हे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयानंही सांगितलं, असं भुजबळ म्हणाले.
लोकांची घरंदारं जाळण्याचा काय अधिकार?
यावेळी त्यांनी जरागेंवरही टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात आणि आपल्याच लोकांवर हल्ले करतात. तिथला नवा नेता हा मागच्या ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात मला शिव्या देत होता. बीडमध्ये त्यांनी आमदारांची घरं जाळली, ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेलं जाळली, त्यांच्यावर हल्ले केले, त्यांच्या बायका-पोरांचे जीव धोक्यात टाकले, त्यांच्या घरांची राखरांगोळी केली. तुम्हाला लोकांची घरंदारं जाळण्याचा काय अधिकार आहे?,असा सवाल भुजबळांनी केला.