तुम्ही तुमच्या आजोबांना विचारा त्यांनी किती कुटुंब फोडली…; मंत्री विखेंचे रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. फडणवीस यांचे कर्तृत्व काय? मला त्यांचा इतिहास पहायचा आहे. तुम्ही कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, अशी टीका रोहित पवार यांनी केली. त्यांच्या टीकेला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं.
मराठा आंदोलकांनी अडवली पवारांची गाडी, मंत्री विखे म्हणाले, ‘भूमिका स्पष्ट करा, किता काळ फसवणार?’
साकुरी-राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील विविध विकासकामांचे भूमिपूजन अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. रोहित पवारांनी केलेल्या टीकेविषयी विचारलं असता त्यांनी रोहित पवार यांना चांगलचं सुनावलं. ते म्हणाले, रोहित पवार जर म्हणत असतील की देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडले, घरं फोटली तर त्यांनी पहिला हा प्रश्न शरद पवारांना विचारावा. त्यांनी संपूर्ण हयातीत किती कुटुंब फोडली, किती कुटुंब उध्वस्त केली, किती कुटुंबांना राजकारणातून संपवलं? हा प्रश्न रोहित पवारांनी त्यांच्या आजोबांना विचारावा. याची उत्तर मिळाल्यावर ते अशी टीका करणार नाहीत, असं विखे पाटील म्हणाले.
Vinesh Phogat : विनेश फोगट प्रकरणात मोठी अपडेट, ‘या’ दिवशी मिळणार रौप्य पदक?
पवारांची भूमिका दुटप्पी
मराठा आंदोलकांनी आज शरद पवारांची गाडी अडवली. याबाबत विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र, ते आरक्षणाबद्दल का बोलत नाहीत? शरद पवारांची भूमिका दुटप्पी आहे. लोकांना किती काळ फसणवार आहात? शरद पवार यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे. पवारांकडून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे, अशी टीका विखे पाटलांनी केली.
Parli Train Accident : परळीमध्ये रेल्वे अपघात, मेंढपाळासह 22 मेंढ्या जागीच ठार
दरम्यान, विखे पाटील यांच्या टिकेला रोहित पवार काय प्रत्युत्तर देतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.