शासन आपल्या दारी; आजपर्यंत शासन घरी होत, गुलाबरावांचा उद्धव ठाकरेंना टोला

  • Written By: Published:
शासन आपल्या दारी; आजपर्यंत शासन घरी होत, गुलाबरावांचा उद्धव ठाकरेंना टोला

आमच्या सरकारने लोकांसाठी शासन आपल्या दारी ही योजना सुरु केली. आजपर्यंत शासन हे घरी होत उद्धव ठाकरेंच्या घरी बसण्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला ते जळगावमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. कोरोना काळात उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा ते घरी राहत असत म्हणून गुलाबराव पाटील यांनी हा टोला लगावला. (Minister Gulabrao Patil criticizes Uddhav Thackeray and Congress, NCP)

आपलं सरकार गतिमान सरकार आहे. काही लोक आपल्यावर टीका करत होती. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाले कधी सरकारमध्ये असताना योजना घेऊन लोकांच्या दारी गेले नाहीत आणि आता आमच्यावर टीका करत आहेत. तुम्ही पण या लोकांच्या दारी मी तुम्हाला पगार सुरु करतो अशी टीका यावेळी पाटलांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.

बापाने कधी गोधडी पाहिली नाही आणि स्वप्न पाहतात खंडाचे अशी शेरो शायरी करून पाटलांनी विरोधकांना टोला लगावला. आम्हाला काळे झेंडे दाखवताय परंतु झेंडे दाखवण्याचे काम आमचे आहे. भाजप – शिवसेना वाल्यांचे तुम्हाला झेंड्याचा दांडा वर असतो का खाली हे देखील माहित नाही. आम्ही काम केल्याने यांच्यासाठी कोणतीच काम शिल्लक राहणार नाहीत म्हणून यांच्या जीवावर आले. असे यावेळी पाटील म्हणाले.

फक्त डिंग्या मारायच्या, पंतप्रधानांवर टीका करण्याची तुमची पात्रता आहे का? हे तपासा; महाजनांचं ठाकरेंवर टीकास्त्र

यावेळी गुलाबराव पाटलांनी शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे जळगाव, धुळे आणि नंदुबार साठी स्वतंत्र आयुक्त कार्यालययांची मागणी केली. ते कार्यालय जळगाव शहरात असावं जेणे करून आम्हाला 300 किलोमीटर लांब नाशिकला जाण्याची गरज पडणार नाही. तसेच बांधकाम आयुक्त कार्यालय देखील जळगावला करावं.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube