दहा टक्के आरक्षण दिलं, विषय क्लीअर, आता जरांगेंनी आंदोलनाची भाषा…; आठवलेंनी ठणकावलं
Ramdas Athawale : सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ठाम आहेत. ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केलं. परीक्षा सुरू असल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, आरक्षणासाठीचा लढा सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाष्य केलं.
BJP Candidate List : प्रज्ञा ठाकूरांचा पत्ता कट, भोपाळमधून कोणाला मिळाली उमेदवारी?
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं. त्यामुळं आरक्षणाचा विषय क्लीअर झाला, आता जरांगेंनी आंदोलनाची भाषा करू नये, असं आठवले म्हणाले.
चर्मकार समाजाच्या पश्चिम महाराष्ट्र वधू-वर मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विचारले असता आठवले म्हणाले, सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला वेग आला होता, मात्र सरकार आरक्षण देणार होते. हा विषय आता क्लिअर झाला आहे.
सुषमा स्वराज यांची कन्या लोकसभेच्या रिंगणात, नवी दिल्लीतून उमेदवारी जाहीर
आठवले म्हणाले, मनोज जरांगे पाटलांनी आता आंदोलनाची भाषा करू नये. शांततेनं मराठा समाजाचे नेतृत्व करावे, ही आमची आशा आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाविरोधात याचिका दाखल झाली असली तरी सरकारने निर्णय घेतला आहे. लोकशाहीत सरकारला अधिकार आहेत. हे आरक्षण प्रत्येकासाठी नसून आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी आहे. ओबीसींनाही तसेच आरक्षण आहे. आमचे सरकार न्यायालयात बाजू मांडणार आहे. यामुळे कायमस्वरूपी आरक्षण मिळेल. त्यात शंका नाही, असे आठवले म्हणाले.
कॉंग्रेसला 40 जागाही मिळणार नाहीत
सध्या लोकसभेचे वारे वाहत आहे. या निवडणुकीत महायुती ४५ जागा जिंकेल, असा भाजप नेते करत आहे. मोदीजींनी देशात ४००चा आकडा पार करण्याचा नारा दिला आहे. तर आठवले यांनी टीका करत काँग्रेसला 40 जागाही मिळणार नाहीत, असं म्हटलं.
सातारा लोकसभेतून कोणाला उमेदवारी मिळणार या प्रश्नावर मंत्री आठवले म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले हे येथून खासदार आहेत. त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची आशा आहे. पण, महायुतीत ज्याला तिकीट मिळेल, त्याच्यासाठी आम्ही काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छाती दुखू लागल्याने उपचार
जरांगे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बरे वाटल्याने त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मनोज जरांगे अंतरवलीत दाखल झाले. मात्र, रात्री त्यांच्याच छातील दुख लागल्यानं डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं