आमदार मंगेश चव्हाणांनी ‘कापसाच्या मापातलं पाप’ उघडकीस आणलं…

आमदार मंगेश चव्हाणांनी ‘कापसाच्या मापातलं पाप’ उघडकीस आणलं…

धुळे : आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘कापसाच्या मापातलं पाप’ उघडकीस आणलं आहे. धुळ्यातील मुकटीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मालाची उघडपणे लूटमार कशी केली जाते याचं प्रात्यक्षिकच जळगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एका व्हिडिओद्वारे करुन दाखवलं आहे. व्हिडिओमध्ये चव्हाण यांनी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या कापसाचं मोजमाप करीत असताना वजनकाट्यामध्ये गोलमाल करुन 40 किलो वजनाच्या कापसात तब्बल 12 किलोंची फसवणूक होत असल्याचं दाखवून दिलंय.

बाहेर जिल्ह्यात आपल्या मालाला चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी इतर जिल्ह्यात पिकांचा माल विकत असतो. असंच धुळ्यातल्या मुकटीमध्ये एका व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट केली जात होती.

मोठी बातमी : महाविकास आघाडीत ‘बिघाडी’; काँग्रेसच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार

त्याचवेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी मुकटीमध्ये पोहचत व्यापाऱ्याचा हा गोलमाल उघडकीस आणला आहे. एका शेतकऱ्याने आपला 40 किलो कापूस वेचणीच्या वेळी मोजून घरात ठेवला होता. शेतकऱ्याने हाच 40 किलो कापूस विकण्यासाठी आणला. तेव्हा व्यापाऱ्याने या कापसाचं मोजमाप केलं.

एका फुगे विक्रेत्याने 2.1 अब्ज रुपयांची कंपनी बनवली, भारतीय कंपनीचा आंतरराष्ट्रीय प्रभाव कायम

त्यानंतर या शेतकऱ्यांच्या कापसात तब्बल 10 किलोने घट झाल्याचं निदर्शनास आलं. शेतकऱ्याने ही माहिती आमदार मंगेश चव्हाण यांना दिली. त्यानंतर व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर सदरील व्यापाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलीय.

उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या फोटोला चपलांनी बडवणार का? राम कदमांचा सवाल

घडलेल्या प्रकारानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी फसवणुकीच्या घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर करीत शेतकऱ्यांना या काटेमारांपासून सावध रहा, असं आवाहन केलं आहे. आमदार चव्हाण ट्विटमध्ये म्हणाले, शेतकरी बांधवांनो, काटेमारांपासून सावधान… “दोन पैसे जास्त मिळावे म्हणून अनेक शेतकरी आपला कापूस बाहेरच्या जिल्ह्यातील अनोळखी व्यापाऱ्यांना विकतात, मात्र, याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांचा कापूस मोजताना काटा मारला जातो व त्यात मोठी फसवणूक शेतकऱ्यांची होते” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

अ‍ॅक्टिव्हा प्रेम ते महाराष्ट्र दौरा… धंगेकरांनी स्पष्टच सांगितले

40 किलोमागे आमची 10 ते 12 किलो मालाची लूट व्यापाऱ्यांकडून केली जात असल्याची प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना अशा प्रकारे लुटलं जातंय. या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन जेलमध्ये टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नसल्याचं आमदार मंगेश चव्हाण म्हटलंय.

दरम्यान, अवकाळी पावसाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही स्वरुपाची भरीव मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आधीच मोठं अर्थिक संकट आणि आता व्यापाऱ्यांकडून ही अशी काटेमारी होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाल्याचा सूर शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube