Rohit Pawar : ‘होय मी पेटवतोय महाराष्ट्र’; विरोधकांच्या ट्रोलिंगवर रोहित पवार भडकले…

Rohit Pawar : ‘होय मी पेटवतोय महाराष्ट्र’; विरोधकांच्या ट्रोलिंगवर रोहित पवार भडकले…

Rohit Pawar : होय मी पेटवतोय महाराष्ट्र, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) विरोधकांच्या ट्रोलिंगवर भडकले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, टीका सुरुच असतात, अशातच माझ्याविरोधात भाजप अचानकपणे सक्रिय होऊन मला ट्रोल केलं जात असल्याचा आरोपही रोहित पवार(Rohit Pawar) यांनी केला आहे, दरम्यान, राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सामिल झाल्यानंतर राष्ट्रवादी-भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार धुमशान सुरु आहे, शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून जाहीर सभांमधून तर सत्ताधाऱ्यांचे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून टीका होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच रोहित पवार यांना ट्रोल करण्यात आल्याने ते भडकल्याचे दिसून आले आहेत.

Constitution House : जुन्या संसद भवनाला मिळाले नवीन नाव; PM मोदींनी केली मोठी घोषणा

रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले, भाजपची ट्रोल गँग माझ्या विरोधात कालपासून अचानक सक्रिय होऊन मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. या ट्रोल गँगचा विषय काय तर रोहित पवार राज्यातल्या युवकांना पेटवत आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

‘मला पक्षातून काढून टाका नाहीतर..,’; नाराज बबनराव घोलपांचा खुलासा

तसेच एक महिन्यापूर्वीची फोन क्लिप व्हायरल केली जातेय, ज्यात मी म्हणत आहे की, “परीक्षा फी च्या विषयात सरकार काही ऐकत नाही, त्यामुळे हा विषय थोडा पेटवत ठेवावा लागेल त्याशिवाय हा विषय सुटणार नाही. काही लोकांना आंदोलन करायला सांगितले आहे, त्याशिवाय हे सरकार सुधारणार नाही, असं पवार क्लिपमध्ये म्हणत आहेत. ही क्लिप सध्या भाजपच्या ट्रोलिंग गॅंगकडून पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

IDBI बँकेत नोकरीची उत्तम संधी! कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकाच्या 600 रिक्त पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपूर्वी अर्ज करा

काही दिवसांपूर्वीच विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन आणि राज्यात तलाठी भरती पार पडली. या भरतीसाठी टीसीएस कंपनीद्वारे 1 हजार रुपयांची फी आकारण्यात आली. यावरुन रोहित पवार यांनी सरकारला विधी मंडळाच्या अधिवेशनात चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं. फीच्या मुद्द्यावरुन राज्यातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आंदोलनेही करण्यात आली होती.

‘सनातन’च्या वादात पडू नका’; BJP चा प्लॅन लक्षात येताच राहुल गांधींचा नेत्यांना अलर्ट

सरकारने गंभीरपणे सांगावं यात काही चुकीचं?
सरकारने परीक्षाफीच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लुटमार करायची, पेपरफुटी होत असताना दुर्लक्ष करायचं, कंत्राटीकरणाला बळ द्यायचं, युवा वर्गाच्या आयुष्याचा खेळ मांडायचा. आता या विषयांवर सत्तेच्या मस्तीत बेधुंद असलेल्या सरकारला जाब विचारून विद्यार्थ्यांची भूमिका मांडणं म्हणजे महाराष्ट्र पेटवणं असेल तर होय पेटवतोय मी महाराष्ट्र! आणि तुम्हाला महाराष्ट्र पेटू द्यायचा नसेल तर पेपरफुटी संदर्भात कायदा करा, गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लुटलेली परीक्षा फी परत करा, कंत्राटी_भरतीचा निर्णय रद्द करा. अशी मागणी पवार यांनी केली.

दरम्यान, विद्यार्थ्यानी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही सरकार झोपेचं सोंग घेत असेल, या सरकारपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज पोहचणार नसेल तर या सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर तर उतरावंच लागेल असा इशारा देखील आमदार रोहित पवार यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube