Nana Patole लागले पालिका, ZP निवडणूक तयारीला…
Nana Patole starts preparations for municipal and ZP elections : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष (Political Parties)तयारीला लागले आहेत. आपापल्या परिने निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. विविध पक्षातील नेत्यांनी देशभरात, राज्यात दौरे सुरु केले आहेत. प्रत्येक पक्ष आपापली ताकद आजमावून पाहत आहेत. ताकद वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून सुरु आहे. त्यातच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी आगामी लोकसभा(Loksabha), विधानसभा (Assembly) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Elections to local bodies)पार्श्वभूमीवर प्रदेश निवडणूक समन्वय समिती स्थापन (Formation of State Election Coordination Committee)केली आहे.
2024 च्या निवडणुकीबाबत बाबा रामदेव यांचा मोठा दावा, विरोधकांना येणार ‘एवढ्या’ जागा?
या समितीचे अध्यक्ष कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असणार आहेत. तर विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसिम खान, माजी मंत्री नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, विधानपरिषदेचे गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अमरजीत मनहास, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे हे सर्वजण प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य आहेत. तर समन्वयक म्हणून प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार आणि प्रमोद मोरे असणार आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह सर्वच विरोधी पक्षही राजकीय आखाड्यात उतरले आहेत. त्यासाठी यात्रा, जाहीर सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे, बुथस्तरावरील बैठका घेण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे एकूणच निवडणुकीसाठी पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे.
सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशेहून अधिक जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे हे तयारीला लागले आहेत. त्यासाठी विविध बैठका घेऊन कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम चंद्रशेखर बावनकुळे करत आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही इतर पक्षांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांचं इनकमिंग जोरदारपणे सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.