मराठीसाठी उर बडवणाऱ्यांनी हिंदी सक्ती का स्विकारली? जाधवांची ठाकरेंवर नाव न घेता टीका

मराठीसाठी उर बडवणाऱ्यांनी हिंदी सक्ती का स्विकारली? जाधवांची ठाकरेंवर नाव न घेता टीका

Narendra Jadhav on Udhhav Thackeray for Hindi Compulsion : राज्यात गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात विरोधक सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकारने त्रिभाषासंबंधित जीआर रद्द करत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली एका समितीची स्थापना केली आहे.

गुरूदत्त : अश्वत्थाम्याची भळभळती जखम…

मात्र त्रिभाषासंबंधित जीआर रद्द केल्यानंतर यासमितीची आवश्यकता काय? असा सवाल विरोधक करत आहेत. त्यावर स्वत: नरेंद्र जाधवांनी एका पॉडकास्टवर बोलताना माशेलकर समितीच्या अहवालात नेमकं काय म्हटलेलं होतं? तसेच त्रिभाषासंबंधित जीआर रद्द मग समितीची आवश्यकता काय? यावर उत्तर दिलं.

‘निवृत्तीनंतर वेद-उपनिषदे वाचणार अन् शेती…’, गृहमंत्री शाहांनी दिले रिटायरमेंटचे संकेत

या पॉडकास्टवर बोलताना डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले की, या अहवालामध्ये म्हटलं की, शाळेत इयत्ता पहिलीपासून 12 वीपर्यंत इंग्रजी आणि हिंदी द्वितीय भाषा म्हणून सक्तिने शिकवल्या पाहिजे. हा अहवाल ठाकरेंच्या सरकारने स्विकारला होता. तसेच आता जरी हा जीआर रद्द केला. त्यावर समिती नेमली आहे. ही समिती गरजेची आहे. कारण याचा पुनर्विचार केला जावा.

इतक्या रात्री लग्नासाठी तिला पाहून पुजारी अवाक; अभिनेत्री रेखाच्या लग्नाचा ‘तो’ किस्सा समोर

तसेच जे मराठीच्या नावाने उरबडवेपणा करत आहेत. त्यांनी त्यावेळी तो हिंदी सक्तिचा अहवाल का स्विकारला? तो कसा चुकीचा होता? यावर अभ्यास करण्यासाठी आताची समिती काम करणार आहे. अन्यथा हिंदी सक्तिचा माशेलकरांचा अहवाल आपल्याला स्विकारावा लागेल. मग मराठीचा पुळका आलेल्यांना हे मान्य आहे का? असं म्हणत नरेंद्र जाधवांनी ठाकरे बंधूंवर नाव न घेता टीका केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube