प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हाला 15 सेकंदही पुरेसे…, नवनीत राणांनी इम्तियाज जलीलांना परखड शब्दांत सुनावले
नवनीत राणांनी स्पष्ट शब्दांत सुनावले. 'तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही,' म्हणत त्यांची जलील यांच्यावर जोरदार टीका.
Navneet Rana’s aggressive stance against Imtiaz Jaleel : एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘फक्त मुंब्राच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा होईल’ असे विधान केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी जलील यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. इम्तियाज जलील यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले. ‘तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही,’ असे म्हणत त्यांनी जलील यांच्यावर जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, ‘आम्ही तुम्हाला या देशात अल्पसंख्याक म्हणून राहू दिले, याचा अर्थ आम्ही गप्प बसू असा नाही. गरज पडली, तर प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हाला 15 सेकंदही पुरेसे आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आमच्या शरीरात आजही छत्रपतींच्या पुत्रांचे आणि भक्तांचे रक्त वाहते. हा महाराष्ट्र कधीही हिरवा होणार नाही.’ यावेळी त्यांनी जलील ज्या शहरात राहतात, त्या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असल्याचे ठामपणे सांगत, इतिहासाची आठवण करून दिली.
मुंबईत लोकलमध्ये धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून कॉलेज प्राध्यापकाची निर्घृण हत्या
महिलांच्या अपमानावर तीव्र आक्षेप
इम्तियाज जलील यांनी महिलांबाबत वापरलेल्या भाषेवरही नवनीत राणा यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘महिलांविरोधात अपमानास्पद शब्द वापरणे थांबवले नाही, तर महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल,’ असा इशारा त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या, ‘शिष्टाचार पाळा, सभ्यपणे वागा. या देशात अल्पसंख्याक म्हणून राहत असाल, तर चांगले जगा. धमक्यांनी महाराष्ट्र झुकणार नाही.’ दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, येत्या काळात या मुद्द्यावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
