ब्रेकिंग! अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; प्रभाग क्रमांक 8 ड मध्ये कुमार वाकळे बिनविरोध!

NCP candidate कुमार वाकळे हे अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ ड मध्ये बिनविरोध निवडून आले आहे.

NCP Candidate

NCP candidate Kumar Vakale elected unopposed in Ward No. 8D in Ahilyanagar Municipal Corporation elections : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रभाग क्रमांक ८ ड मध्ये कुमार वाकळे बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खाते उघडले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी आजची (ता. १) मोठी घटना घडली आहे.

प्रभाग क्रमांक सात मधील ड सर्वसाधारण

प्रवर्गात फक्त दोन उमेदवार राहिले होते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाकळे कुमार बबनराव आणि अपक्ष कोलते मुरलीधर रामा या दोघांचे अर्ज मागे राहिले होते आज सकाळी कोलते मुरलीधर रामा यांनी अर्ज मागे घेतला असून या ठिकाणी फक्त कुमार वाकळे यांचा अर्ज राहिला असल्याने ते बिनविरोध निवडणू आले आहे.

प्रभाग 14 मधील लढतीकडे सुरुवातीपासूनच विशेष लक्ष लागले होते. मात्र या प्रभागात आघाडीतील कोणताही अधिकृत उमेदवार रिंगणात उतरला नव्हता. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ऋषिकेश रासकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु छाननीदरम्यान त्यांचा अर्ज बाद झाला. त्याचबरोबर अपक्ष उमेदवाराने अखेरच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रकाश भागानगरे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. परिणामी निवडणूक न होता ते थेट विजयी झाले आहेत.

Amol Balwadkar Exclusive : मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला पण…

दुसराकडे अहिल्यानगरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण 54 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदेसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज छाननीअंती अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक रणांगणात शिंदेसेनेचे उमेदवार आता 49 वर आले आहे. अर्जांवर काही उमेदवारांच्या अनुमोदकांच्या सह्या चुकीच्या होत्या, तर काही उमेदवारांच्या एबी फॉर्मवर खाडाखोड होती. काहींनी एबी फॉर्मच्या झेरॉक्स जोडल्याचे समोर आले, त्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आले.

या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), एमआयएम, आम आदमी पार्टी, बसपा तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले होते.

follow us