Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?; प्रफुल्ल पटेलांनी थेट सांगितलं

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?;  प्रफुल्ल पटेलांनी थेट सांगितलं

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील वाय. बी. सेंटरमध्ये अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

पवार साहेबांनी आपली जबाबदारी सोडू नये असे अनेकांनी म्हटले आहे. पवार साहेबांनी जी कमिटी नेमली होती. त्या कमिटीची बैठक आज झाली. आज कमिटीने या बैठकीमध्ये एक ठराव पारित केला आहे. सर्वानुमते आम्ही तो ठराव पारित केला आहे, असे ते म्हणाले आहेत.

Sharad Pawar Retairment : राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहणार? समितीने केला ठराव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांनी कायम रहावे. त्यांच्या राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा  नियुक्ती करण्यात येत आहे. शरद पवारांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, अशी आम्ही त्यांनी विनंती करणार आहोत. आम्ही आता शरद पवारांची भेट घेऊन त्यांना हा निर्णय सांगणार आहोत, असा निर्णय कमिटीच्या बैठकीमध्ये झाल्याचे प्रफुल्ल पटेलांनी सांगितले आहे.

सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवण्याचा पवारांचा प्लान? मित्राकडूनच मोठा दावा

या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह इतर काही नेत्यांची  नावे या कमिटीमध्ये  होती. यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार हे आपला राजीनामा मागे घेणार की दुसऱ्या कुणाची नियुक्ती करणार, हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube