प्रोटोकॉल तोडत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर फडणवीसांच्या बंगल्यावर दाखल

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 03T135526.926

Rahul Narwekar at Devendra Fadanvis House :  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रोटोकॉल तोडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री यांची असते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान येथे शुकशुकाट असून, राष्ट्रवदीचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत.  त्यामुळे राजकी चर्चा आणखी जोरात रंगू लागल्या आहेत.

काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ ही नेतेमंडळी फडणवीसांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर आली होती. यावेली खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपकडील असलेले उर्जा, ग्रामविकास आणि सिंचन हे खाते राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची माहिती आहे.

अजितदादांना पहिला धक्का : शरद पवारांनी मकरंद पाटलांना बसवलं गाडीत

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांचा अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत नार्वेकर हे फडणवीसांच्या बंगल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. प्रोटोकॉलप्रमाणे फडणवीस व इतर नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे जाणे क्रमप्राप्त आहे. पण नियम डावलत नार्वेकर हे फडणवीसांच्या घरी दाखल झाले.

मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री यांची असते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकिय निवासस्थान येथे शुकशुकाट असून राष्ट्रवदीचे नेते, विधानसभा अध्यक्ष यांची उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यात खलबतं सुरु आहेत.

भुजबळ, वळसे पाटील, पटेल हे…; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

दरम्यान, कालच्या बंडानंतर आजित पवार दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत अजित पवारांकडून पक्षाची भूमिका मांडली जाणार असून, ही भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असेल. यात अजित पवार गटाची भूमिका आणि आगामी काळात कशा पद्धतीने काम करणार याबाबत अजित पवार भाष्य करणार असल्याचे सांगितले जात आहे. तोपर्यंत कोणत्याही नेत्याला माध्यमांशी किंवा कोणत्याही प्रकारची  भूमिका न मांडण्याची तंबी देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत अजित पवारांकडून खात्यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us