Video : एकच खासदार तरीही दिल्लीत अजितदादांचा दबदबा; मिळाला ‘स्पेशल’ मान
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या केंद्रात सत्ता स्थापनेच्या. यासाठी आज (दि.7) राजधानी दिल्लीत भाजपच्या नेतृत्त्वाखाली NDA ची सेंट्रल हॉलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातील महायुतीला हवे तसे यश मिळवता आले नाही. भाजपला राज्यात 9, शिंदेंच्या शिवसेनेला 7 तर अजितदादांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचा केवळ एकच खासदार निवडून आणण्यात यश आले. केवळ एकच खासदार निवडणून आल्यानंतही अजितदादांना दिल्लीत आयोजित NDA च्या बैठकीत ‘स्पेशल’ मान देण्यात आल्याचे दिसून आले. (Ajit Pawar Get Special Treatment In Delhi NDA Meeting)
मोदींची एकमताने NDA च्या नेतेपदी निवड; चंद्राबाबू-नितीश यांनी केल तोंडभरून कौतुक
बैठकीला कोण कोण उपस्थित
एनडीएमधील पक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप मांडणार आहे. त्याशिवाय नरेंद्र मोदी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. बैठकीसाठी शिवसेनेचे सर्व खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत.
महायुतीला धोक्याची घंटा! लोकसभा निवडणुकीत ‘164’ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘मविआची’ सरशी
अजित पवारांना अमित शाहंच्या उजव्या हाताला स्थान
लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत सत्ता स्थापनेपूर्वी NDA ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीत सर्वाचे लक्ष वेधले ते बैठक व्यवस्थेने आणि खास करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी.कारण या बैठकीत अजित पवार हे अमित शाह यांच्यासोबत मंचावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे हेही मंचावर नितीश कुमार यांच्या शेजारी बसलेले दिसले. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एनडीएच्या नेत्यांसोबत स्ट्रेंटल हॉलमध्ये बसले होते.
भव्य राम मंदिरानंतरही भाजपने अयोध्या का गमावली? वाचा ग्राऊंड रिअॅलिटी
अजित पवारांना मंचावर स्पेशल मान का?
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा केवळ एकच खासदार निवडणून आला आहे. मात्र, त्यानंतरही ते अमित शाहंसोबत मंचावर बसलेले दिसल्याने त्यांना एवढा मान का देण्यात आला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची धूरा अजित पवारांकडे आहे. त्यामुळेच अजितदादांना आजच्या NDA च्या बैठकीत अमित शाहंसह अन्य महत्त्वाच्या नेते मंडळींसोबत मंचावर बसण्याचा मान देण्यात आला.
#WATCH | Leaders of the NDA at Samvidhan Sadan (Old Parliament) ahead of the meeting of the NDA MPs.
(Source: Sansad TV) pic.twitter.com/rX9n3WQgPt
— ANI (@ANI) June 7, 2024