Ahmednagar News : महापालिका कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; 2 ऑक्टोबरपासून जाणार रजेवर

Ahmednagar News : महापालिका कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; 2 ऑक्टोबरपासून जाणार रजेवर

Ahmednagar News : अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून कामगार युनियनच्यावतीने नगर ते मंत्रालय पायी लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे(Anant Lokhande) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. 2 ऑक्टोबरपासून महापालिक कर्मचारी सामुहिक रजेवर जाणार असल्याचंही लोखंडे(Anant Lokhande) यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजी मंडईनंतर आता राहुल गांधी फर्निचर मार्केटमध्ये; म्हणाले, थोडं शिकण्याचाही प्रयत्न केला…

पुढे बोलताना लोखंडे म्हणाले, मागील 27 वर्षांपासून महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यां प्रलंबित आहेत. याची अद्याप दखल घेतलेली नाही. महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले. राज्यातील इतर महापालिकांच्या आस्थापना खर्चाची टक्केवारी ही शासनाने निर्धारीत केलेल्या टक्केवारीपेक्षा कित्येक प्रमाणात जास्त असताना सदर महापालिकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी करण्यात येऊन सदर पोटीचे लाभ देण्यात आले.

धक्कादायक! देशात 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण; WHO कडून आकडेवारी जाहीर

मात्र, नगर महापालिकेची केवळ आस्थापना लागू खर्चाची टक्केवारी ही शासन निर्धारीत टक्केवारीपेक्षा जादा असल्याचे कारण देऊन सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचे लाभ कामगारांना शासनामार्फत नाकारण्यात आलेले आहेत. ते तातडीने लागू करावेत, अशी प्रमुख मागणी लोखंडे यांनी यावेळी केली आहे. तसेच लाड समितीच्या शिफारशीनुसार मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नेमणुका देण्यात याव्यात या प्रमुख २ मागण्यासह विविध प्रलंबित मागण्या या नोटिशीत देण्यात आलेल्या आहेत.

India Canada Conflict : पीएम मोदींच्या अपमानावर काँग्रेसचाही संताप; कॅनडात नेमकं काय घडलं?

सहकुटुंब 16 दिवसांचा पायी प्रवास :
मनपा कामगारांच्या या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आता हा लढा देण्यात येणार आहे. नगर ते मुंबई ‘पायी लाँग मार्च’ २ ऑक्टोबरला नगरमधून कल्याण रोड मार्गे निघेल. यात सर्व कर्मचारी सहकुटुंब सहभागी होतील. १६ दिवसांचा पायी प्रवास करून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. या आंदोलनासाठी कर्मचारी सामुहिक रजेवर जाणार आहेत.

दरम्यान, शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून केवळ अग्निशमन, आरोग्य व पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार असून इतर सर्व कामकाज बंद राहणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube