श्रीगोंद्यात साजन पाचपुतेंवर गुन्हा दाखल; समोर आलेले कारणही धक्कादायक!

श्रीगोंद्यात साजन पाचपुतेंवर गुन्हा दाखल; समोर आलेले कारणही धक्कादायक!

Case registered against Sajan Pachpute deu to Cattle slaughter : श्रीगोंदा तालुक्‍यातील कोकणगाव येथील शेतात बांधून ठेवलेल्या १४ गोवंशाच्या जनावरांची गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने सुटका केली. दरम्यान, यावेळी काही जणांनी हाय होल्टेज ड्रामा करीत गोंधळ घालून जनावरांची सुटका करण्यास विरोध केला व गोरक्षकांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिवसेनेचे (ठाकरे गट) उपनेते व काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे…

याप्रकरणी गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन (पुणे) यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दाखल फिर्यादीनुसार मुस्तफा कुरेशी, इब्राहिम कुरेशी, आतिक कुरेशी, साजन सदाशिव पाचपुते, महेश चव्हाण, शारदा महेश चव्हाण, शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्यामार्फत अक्षय कांचन हे गोरक्षणाचे काम करतात.

राज्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारचा ‘महा’प्लॅन, अर्थसंकल्पात अजित पवारांनी केल्या मोठ्या 12 घोषणा

याबाबत अधिक माहिती अशी, कोकणगाव (ता. श्रीगोंदे) येथील महेश चव्हाण, शारदा महेश चव्हाण यांच्या शेतात कत्तलीच्या उद्देशाने जनावरे डांबून ठेवली असून श्रीगोंदे येथे कतलीसाठी घेऊन जाणार आहेत व ते गोमांस पुणे व मुंबई येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती कांचन यांना मिळाली. त्यानंतर कांचन व त्यांचे सहकारी गोरक्षक आकाश अशोक लोंढे, आकाश मधुकर लांडगे, दत्ता ठोंबरे, शुभम मासोळे, आपा लोंढे, विकास तरंगे व वैभव खेरे व क्रतिक चौधरी हे हिरडगाव फाटा येथे आले. त्यांनी सर्व माहिती पोलिसांना कळवली.

Video : अजित पवारांचा अर्थसंकल्पातून कुणाला काय मिळालं? वाचा महाबजेटची A टू Z माहिती

काही वेळातच पोलिस आल्यावर महेश चव्हाण व शारदा महेश चव्हाण यांच्या कोकणगाव येथील शेतात गेले असता, तेथे कत्तलीच्या उद्देशाने 14 संकरित जनावरे डांबुन ठेवल्याचे दिसून आले. कांचन व त्यांच्या सहकाऱ्यांना जनावरांना पाणी दिले. चव्हाण नामक व्यक्‍तीला पोलिसांनी जनावरांबाबत माहिती विचारली असता. त्याने ही आपली जनावरे नसून कोणी येथे बांधली हे माहित नसल्याचे सांगितले.

त्यानंतर तेथे शारदा महेश चव्हाण आल्या. त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर तेथे तिचे पती महेश चव्हाण, तंटामुक्‍तीचे अध्यक्ष शिंदे यांना बोलावून घेतले. त्यांनीही गोरक्षकांना धमकावले. महेश चव्हाण याने साजन पाचपुते यांना फोन लावून दिला. त्यावेळी साजन पाचपुते यांनीही तेथुन निघुन जा, अन्यथा जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube