…म्हणून अजितदादांना पाठिंबा पण लंके पवारांच्या कायम संपर्कात; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Jayant Patil on Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election) अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके ( Nilesh Lanke) यांच्यासाठी सध्या महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरू आहे. या दरम्यान शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil) आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निलेश लंके यांनी अजित पवार यांना पाठिंबा का दिला? तसेच ते शरद पवार यांच्या सहा महिन्यांपासून संपर्कात होते. त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं.
अरविंद केजरीवालांची तिहार तुरुंगातून सुटका, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन
…म्हणून लंकेंचा अजितदादांना पाठिंबा
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार यांनी बंड करून सत्तेत सहभागी होणे. ही घटना अत्यंत अचानक घडली होती. त्यामुळे अनेक आमदारांना मोठा प्रश्न पडला होता. तसेच त्यांनी सत्तेमध्ये सामील होण्याच्या पत्रावर सह्या देखील केल्या होत्या. त्यामुळे भूमिका बदलल्यानंतर आपली आमदारकी जाणार याची देखील भीती त्यांना होती. तशीच ती लंके यांना होती. त्यामुळे निलेश लंकेने आमदारकी धोक्यात येऊ नये. म्हणून अजित पवार गटाला पाठिंबा दिला. मात्र त्यांची भूमिका स्पष्ट होती.
..अन् प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची घोषणा झाली; नितीन गडकरींनी सांगितली हिस्ट्री
ते कायमच शरद पवारांच्या संपर्कात होते. गेल्या सहा महिन्यापासून ती शरद पवार यांच्या पक्षांमध्ये येणार हे ठरलं होतं. त्याचबरोबर शरद पवार यांचे पक्षांमध्ये अजित पवार यांच्या गटामध्ये गेलेल्यांना नो एन्ट्री होती. मात्र जे कायम आमच्या संपर्कात होते. त्यांना आम्ही प्रवेश दिला. ज्यामध्ये अमोल कोल्हे आणि निलेश लंके यांचा समावेश होतो. तसेच लंके यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्यानंतर निवडणुकाजवळ आल्यानंतर आम्ही त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं. असं देखील यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं.