कोपरगावला दररोज पाणीपुरवठा करणार; काका कोयटेंनी मांडले विकासाचे व्हिजन

Kaka Koyate : मी उमेदवारी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आग्रह धरला. गावाच्या विकासासाठी काही करा, असे ते म्हणाले.

  • Written By: Published:
Kaka Koyate Kopergaon Vision

Kaka Koyate Kopergaon Vision-कोपरगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये (Kopergaon NagarPaika Election) महायुतीमध्ये फूट पडलीय. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपचा कोल्हे गट यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी येथून महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे (Kaka Koyate) यांना नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरविले आहे. काका कोयटे यांनी लेट्सअपशी संवाद साधताना कोपरगावच्या विकासाचे व्हिजन मांडले आहे.

विरोधकांनी कोपरगावच्या विकास कामांना स्थगिती दिली होती, काकासाहेब कोयटे यांना लोकांचा पाठिंबा

विकासाचा प्रोजेक्ट अजितदादांना देणार

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत काका कोयटे म्हणाले, मी उमेदवारी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आग्रह धरला. गावाच्या विकासासाठी काही करा, असे ते म्हणाले. ते मला अजितदादांकडे घेऊन गेले. तेव्हा दादा म्हणाले, काका मी तुमचे सहकारी चळवळीचे व्हिजन बघतो. तुमच्या चांगल्या कल्पना असतात, मग तुमचे व्हिजन गावाकडे उपयोगी आणले पाहिजे. कोपरगावचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करा, कोपरगावच्या विकासासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. कोपरगावच्या विकासासाठी हवा तेवढा निधी देईल, असे अजित पवार म्हणाले. कोपरगावाच्या जिव्हाळ्यामुळे राजकारणात ओढलो गेलो आहे.

पहिल्यांदा कोपरगावचा पाणी प्रश्न सोडविले पाहिजे, असे मी अजित पवारांना सांगितले. पूर्वी कोपरगावला 20 ते 25 दिवसांनी पाणी येत होते. आमदार आशुतोष काळे यांनी पाचव्या तलावाचे काम केले. त्यामुळे चार-पाच दिवसांनी कोपरगावला पाणी येत आहे. आधी दोन दिवसाला, मी एक दिवसाला, दररोज पाणी कोपरगावला देणार आहे हे पहिले व्हिजन आहे.


विरोधकांकडून विनाकारण टीका

आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे रस्ते चांगले होत आहेत. आणखी चांगले रस्ते तयार करायचे आहेत, तेही व्हिजन आहे. कोपरगावचे विरोधक विनाकारण टीका करतात, कोपरगावमध्ये धूळ आहे. खरंतर आशुतोष काळे यांनी कोपरगाव धूळमुक्त केले आहे. तरीसुध्दा धूळ राहिली असेल तर आधुनिक तंत्रज्ञान वापरून शहर धूळमुक्त करू. मोकाट जनावरे हटवायचे, कचऱ्याचे ढिग साफ करायचे आहे. मी दररोज घंटागाड्यांबरोबर फिरणार असल्याचे कोयटे यांनी सांगितले.

मॉर्निंग वॉक शहराच्या प्रत्येक भागात करणार आहे. साफसफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाबरोबर मी राहणार आहे. नागरिकांशी संवाद साधला जाईल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी येणार आहे. पाणी येण्याची वेळी त्या भागात ठाण मांडून बसणार आहे. जागेवरच मी लोकांसाठी मी उपस्थित राहणार आहे. फिल्डवर मी काम करणार असल्याचे कोयटे म्हणाले.

राजकारणापासून अलिप्त का राहिले ?

राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, मी राजकारणाच्या बाहेर होतो. त्याचे कारण मी सहकारी पतसंस्था चळवळीशी जोडलो गेलो आहे. कोपरगाव शहरात संपदा नागरी पतसंस्था आहे. ही राज्यातील अग्रेसर संस्था समजली जाते. महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे सतरा वर्षांपासून मी अध्यक्ष आहे. सहकारी पतसंस्था चळवळीचा काम करत असल्यामुळे मला राजकारणापासून दूर जावे लागले. आता हे जाणवायला लागेल ज्या ठिकाणी फिरतो, गावे पाहतो, तो सुंदरक आहे. आपले गाव कोपरगाव तसे का होऊ नये, असे वाटत होते. त्यामुळे पुन्हा राजकारणात आलो, असे कोयटे म्हणाले.

follow us