लोकसभा रणांगण! लंकेंचा कल पवारांकडे, तर सुजय विखेंनी घेतली दादांची भेट…

लोकसभा रणांगण! लंकेंचा कल पवारांकडे, तर सुजय विखेंनी घेतली दादांची भेट…

अहमदनगर – लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तारखा जाहीर झाल्या आहेत. मे महिन्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यातच नगर दक्षिणमध्ये यंदा चांगलीच लढत पाहायला मिळणार असे चित्र सध्या दिसतेय. भाजपकडून (BJP) नगर दक्षिणेसाठी सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निलेश लंके (Nilesh Lanke) यांची उमेदवारी निश्चित होईल अशी चर्चा आहे. दरम्यान सुजय विखे यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे निलेश लंके यांनी देखील शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे. दरम्यान येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने लंके – विखे यांच्याकडून पवार यांच्या घेण्यात आलेल्या भेटीला मोठे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.

Madhuri Dixit : ‘धक धक गर्ल’चं डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट 

नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण ठरणार? यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर पक्षाकडून पुन्हा एकदा सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपचा दक्षिणेतील चेहरा ठरला मात्र महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. दुसरीकडे सध्या अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके हे लोकसभेची जोरदार तयारी करत आहे. मात्र महायुतीमध्ये नगर दक्षिणेची जागा भाजपाकडे असल्याने लंके यांची मोठी अडचण झाली. त्यामुळं लंकेंनी दादांची साथ सोडण्याच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली.

मोदी सरकारला मोठा धक्का : फॅक्ट चेकिंग युनिटला सुप्रीम कोर्टाची स्थगिती 

लंके यांनी गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांच्या भेटीगाठी घेण्याचे प्रमाण वाढवले. यातच लंके यांनी शरद पवार गटात जाणे ठरविले तर त्यांना आमदारकीवर पाणी सोडावे लागेल असा दम देखील दादांनी भरला. लंके यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केली नाही. मात्र, लोकसभेचे गणित त्यांच्या डोक्यात फिट झाले असल्याने ते निवडणुकी लढविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी तुतारी देखील हाती घेतली होती, यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

तर दुसरीकडे विखे यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. लंके यांनी लोकसभेपूर्वी दादांची साथ सोडण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल हे अजित दादांच्या जिव्हारी लागले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर दक्षिणेत सुजय विखेंना भाजपकडून उमदेवारी देण्यात आली असून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. तर  लंकेंच्या डावपेचामुळे दादांकडून विखे यांना महायुतीचे उमेदवार म्ह्णून पाठबळ दिले जाणार आहे हे मात्र निश्चित आहे. नगर दक्षिण सध्या राष्ट्रवादी व भाजपसाठी प्रतिष्टेची लढाई बनलेली आहे. यामुळे लंके यांना धोबीपछाड देण्यासाठी दादा स्वतः विखेंसाठी मैदानात उतरणार असे बोलले जात आहे.

दादा लंकेवर नाराज…
लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश करू नये यासाठी अजित पवार यांनी लंके यांना सल्ला देखील दिला. तसेच लंके हे फक्त पारनेर पुरते परिचित आहे. लोकसभेसाठी सहा मतदार संघ आहेत. यामध्ये पारनेर, शेवगाव-पाथर्डी, नगर शहर, श्रीगोंदा, राहुरी, कर्जत-जामखेड यांचा समावेश होतो. त्यामुळे लंकेंनी पुन्हा एकदा विचार करावा, असा अजित पवारांनी सल्ला दिला होता. मात्र लंके यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही आहे.

विखेंसाठी दादा मैदानात उतरणार
निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असून महायुतीच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार यांच्या वाढत्या भेटीमुळे याबाबतची कल्पना अजित पवारांना आली असल्याने आता दादा देखील विखेंसाठी सरसावले आहे. लंके यांची भूमिका अजित पवार यांना जिव्हारी लागली असून बदलत्या राजकीय परिस्थितीत महायुतीत आपले स्थान भक्कम ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना निवडून आणण्याचा चंगच अजितदादांनी बांधला असल्याचे बोलले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube