अजितदादांचा नगरसाठी नवा प्लॅन! शरद पवार गटाने डावललेल्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यांना मानाचं पान
Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडात अजित पवार यांना साथ देणाऱ्या नगर शहरातील दोघा पदाधिकाऱ्यांची शरद पवार गटाने हकालपट्टी केली होती. मात्र, आता अजित पवार गटाने या दोन्ही पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव विधाते आणि अभिजीत खोसे यांना सन्मान देत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पक्षविरोधी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून १८ जुलै रोजी राज्यातले पक्षातील जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष अशा तब्बल २१ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यामध्ये नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे निकटवर्तीय शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते आणि शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांचा समावेश होता.
तुम्हाला किंमत चुकवावी लागेल; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांची पत्रकातून धमकी
या कारवाईमुळे दोघांचेही राजकीय भवितव्य संकटात सापडले होते. यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासह गेलेल्या काही आमदारांना मंत्रीपदेही मिळाली. इतकेच नाही तर नागालँडमध्ये भाजपसह सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनीही अजित पवार यांनाच पाठिंबा दिला.
दुसरीकडे अजित पवार यांनीही राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले. शरद पवार यांच्या गटाने ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना पु्न्हा सामावून घेण्यावर भर दिला गेला. एकप्रकारे त्यांचे पुनर्वसन करून पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये नगरच्या दोन शिलेदारांचाही समावेश आहे.
‘शुभेच्छा शतकोटी, ‘अजित’ महाराष्ट्रासाठी’ : आणखी एका आमदाराने सोडली शरद पवारांची साथ?
पदे आधीचीच, गट मात्र बदलले
गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला. निर्णयानुसार राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्ष पदावर प्रा.माणिकराव विधाते तर शहर कार्याध्यक्षपदावर अभिजात खोसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही पदधिकाऱ्यांकडे पदे जरी आधीचीच असली तरी आता या दोघांचे गट मात्र बदलले आहेत.
दरम्यान, मोठ्या साहेबांनी जरी कारवाईचा बडगा उगारला असला तरी मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या दादांनी आपल्या पक्षाची एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्यावर पुन्हा एकदा पक्षकार्याची जबाबदारी सोपवली आहे. दादांच्या या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात शरद पवार यांच्या गटाला पुन्हा आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.