‘पानटपरीवाला म्हणता, आम्ही मेहनत केली, खासदारकीसाठी तू काय केलं?’ गुलाबरावांचा राऊतांवर प्रहार

‘पानटपरीवाला म्हणता, आम्ही मेहनत केली, खासदारकीसाठी तू काय केलं?’ गुलाबरावांचा राऊतांवर प्रहार

Gulabrao Patil replies Sanjay Raut : राज्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू (Lok Sabha Election) आहे. या प्रचारात एकमेकांवर टीका करताना नेत्यांकडून आता शब्दांच्या मर्यादा देखील पाळल्या जात नाहीत. शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटातील नेते चांगलेच भडकले आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी (Gulabrao Patil) संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत वाया गेलेली केस आहे. त्यांना ठाण्याच्य दवाखान्यात दाखल करायला हवं, असे पाटील म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले, आम्हाला जर हे असे म्हणत असतील पण आम्ही अशी भाषा वापरणार नाही. कारण आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. पण त्यांनी अंगावर घेतलं आहे तर आता आम्हीही त्यांना शिंगावर घेऊ. संजय राऊतांची आजची भाषा संस्कृतीला शोभणारी नव्हती. त्यांना अजून खानदेशच्या बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत. त्यांच्या भाषेपेक्षा आमची भाषा अत्यंत खालच्या दर्जाची आहे. पण आम्ही वापरणार नाही.

Gulabrao Patil : विकेट जाण्याची चर्चा अन् पवारांसोबत प्रवास… राजधानी एक्सप्रेस मंत्रिपद वाचविणार?

बाळासाहेबांनी पानटपरीवाल्याला आमदार केलं पण आता या पानटपरीवाल्याला घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा गुलाबरावांनी चांगलाच समाचार घेतली. नुसतं पानटपरीवर बसून आमदार होता येत नाही. आम्ही आंदोलनं केली, केसेस अंगावर घेतल्या, लोकांची सेवा सुद्धा केली. पण, तू काय केलं. हातात पेन घेऊन अग्रलेख लिहिला आणि खासदार झाला असा खोचक टोली त्यांनी राऊतांना लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube