ऐन भाषणात बत्ती गुल! फडणवीस म्हणतात, “हमको रोक सके किसी अंधेरे में…”

ऐन भाषणात बत्ती गुल! फडणवीस म्हणतात, “हमको रोक सके किसी अंधेरे में…”

Devendra Fadnavis Speech in Bhusawal : राज्यात लोकसभा निवडणुकांचा ज्वर भरला आहे. रणरणत्या उन्हात प्रचाराचा जोर वाढला आहे. स्टार प्रचारकांच्या भरउन्हात सभा होत आहेत. या सभांना लोकांचाही प्रतिसाद मिळत आहे. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात (Devendra Fadnavis) ठिकठिकाणी सभा घेत आहेत. फडणवीसांकडे ऊर्जा खातंही आहे. आता असाच एक किस्सा या ऊर्जामंत्र्यांच्या बाबतीत घडला. फडणवीस सायंकाळच्या वेळी भाषण करत होते, अचानक लाईट गेली आणि अंधार झाला. तरीही फडणवीसांनी भाषण सुरुच ठेवलं. उलट शेरोशायरी करत वेळही मारून नेली.

त्याचं असं झालं, रावेर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत फडणवीस भाषण करत होते. त्यावेळी अचानक लाईट गेली. त्यावेळीही फडणवीसांनी भाषण थांबवलं नाही. ते म्हणाले, काही काळजी करू नका. लाईट बंद झाले असले तरीही तुम्ही मोबाईलचे लाईट सुरू केले आहेत. आपला करंटच असा आहे की लाईटची गरज नाही. ‘हमको रोक सके ये किसी अंधरे में दम नहीं, रोशनी हम से है रोशनी से हम नहीं’, असा खास शेरही त्यांनी या निमित्ताने सुनावला.

Devendra Fadnavis : मी पुन्हा आलो, पण दोन पक्षांना फोडून, फडणवीस स्पष्टचं बोलले

यानंतर फडणवीसांनी मागील दहा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. इंडिया आघाडीचे सगळेच नेते म्हणतात आम्ही इंजिन आहोत. या इंजिनमध्ये फक्त त्यांच्या परिवारातील लोकांनाच बसण्यासाठी जागा आहे सामान्य माणसांना नाही. त्यासाठी आता तुम्ही रक्षा खडसे यांनी निवडून द्या. त्यांना निवडून दिलं म्हणजे तो डबा मोदींच्या विकासरुपी इंजिनला जोडला जाईल.

फडणवीस पुढे म्हणाले, ही निवडणूक नेहमीची नाही. कोण देशाला सुरक्षा देऊ शकतं याचा फैसला करण्याची निवडणूक आहे. दहा वर्षांत मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. त्याची आज जगभरात चर्चा होत आहे. वीस कोटी लोकांना पक्की घरे दिली. 50 कोटी लोकांच्या घरी गॅस पोहोचवला. साठ कोटी लोकांच्या घरात नळानं पाणी दिलं. 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. त्यातील सात कोटी महाराष्ट्रातील आहेत.

Eknath Shinde : ‘शिवतारेंसारखा माणूस हवा, दोस्ती करो तो दिलसे अन् दुश्मनी भी दिलसे’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube