‘रोजगाराची निर्मिती करणारी अर्थव्यवस्था निर्माण करा’; मंत्री गडकरींचं आवाहन
Nitin Gadkari News : रोजगाराची निर्मिती करणारी अर्थव्यवस्था निर्माण करायची असल्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उद्योजकांनी केलं आहे. अहमदनगर मर्चन्ट्स को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सुवर्ण महोत्सवाला नितीन गडकरी उपस्थित होते. गडकरी यांच्यासह अहमदनगर भाजपचे अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी नगरच्या औद्योगिक, कृषी आणि सहकार क्षेत्राबद्दल भाष्य केलं आहे.
भाजपचे प्रदीप कंद राष्ट्रवादीच्या वाटेवर : अमोल कोल्हेंविरोधात अजितदादांचा जुन्या शिलेदार मैदानात ?
नितीन गडकरी म्हणाले, देशाचा विकास करायचा असेल तर रोजगाराची निर्मिती करावी लागणार असल्याचं महात्मा गांधीजी म्हणायचे. रोजगाराची क्षमता वाढल्यास गरीबी दूर होईल. तसंच भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे असं मोदींचं स्वप्न आहे, नगरमध्ये विखेंनी त्या काळात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर हस्तीमल मुनोत यांनी सहकाराच्या चळवळीतून मर्चन्टस् बॅंकेची स्थापना केली. एखादा माणून जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा तो रोजगाराची निर्मिती करतो, या शब्दांत नितीन गडकरींनी बॅंकेचं कौतूक केलं आहे.
तसेच बॅंकेचे संस्थापन हस्तीमल मुनोत हे गांधीवादी विचारांचे आहेत. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपल्याला सर्वच क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढवायचा आहे. जगातली तिसरी अर्थव्यस्था आपल्याला बनावायची आहे. आपल्याला एकमेकांना मदत करुन पुढे जायचं असून सहकारामध्ये सर्वांनीच सहकार्य केलं पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत. सहकार चांगला आहे पण सहकारा क्षेत्रातलं नेतृत्व योग्य असेल तर प्रगती होते, बॅंकेला सक्षम नेतृत्व मिळालं म्हणूनच प्रगती झाल्याचं गडकरी म्हणाले आहेत.
Bachhu Kadu : जरांगेंच्या मागे काही शक्ती काम करतेय, त्यांनी बळी पडू नये; बच्चू कडूंचा आरोप
बॅंकिग क्षेत्रात विश्वसनियता आणि नावलौकिक हे 21 व्या क्षेत्रातलं मोठं भांडवल असून हे राजकीय क्षेत्रातही आहे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात विश्वसनियता हवीयं. नगरमध्ये गोरक्षण सुरु आहे. आपल्या देशातून गीर जातीची गाय जपानमध्ये नेण्यात आली. त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हीच गाय 60 लिटर दूध देत आहे. त्यामुळे आता ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात आधुनिकता आणण्याची गरज आहे. इथेनॉल आज आलं आहे. इथेनॉलपासून बायोअॅलिवेशन इंधन तयार करण्यात येत आहे त्या इंधनावर विमाने चालत आहेत. दोन वर्षांपूर्वी फायटर जेट विमान त्यावर चालतं. शेतकरी आता अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झालायं, आता हवाई इंधनदाता झाला असल्याचं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, ग्रीन हायड्रोजनही शेतकरी आता तयार करणार आहे. माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे. मिराई म्हणजे भविष्य मर्सिडिजसारखी आहे. मोटारसायकलही आपण तयार केल्या आहेत. मंत्री झाल्यावर मी एक काम केल सायकल रिक्षा माणूस चालवायचा . एक बिल मी आणलं ही प्रथा बंद करायची आज मला आनंद आहे, देशातील एक कोटी लोकं माणूस माणसाला ओढत होते. मेकॅनिक रिक्षा, ईरिक्षा आज देशात आली. मी जेव्हा हे विषय सांगायचो तेव्हा रस्त्यात बंद पडली तर काय होईल असं म्हणायचे पण असं नाही झालं, असंही त्यांनी सांगितलं आहे.