पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; आशुतोष काळेंच्या अधिकाऱ्यांना बांधावरून सूचना
Ashutosh Kale : दोन दिवसापासून कोपरगाव (Kopargaon)मतदार संघात पडत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन सनासुदीच्या तोंडावर हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली. अनेक गावांत सोयाबीन, बाजरी, मका, कापूस तसेच भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, नुकसानीची आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार महेश सावंत (Mahesh Sawant) व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे (Manoj Sonawane) यांना दिल्या आहेत.
Bigg Boss Marathi: घरात सूरजला मिळणार सुखद धक्का; आत्या अन् बहिणींना पाहताच पाणावले डोळे
यंदा कोपरगाव विधानसभा मतदार संघात पर्जन्यमान जेमतेमच झाले असले तरी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होवून सर्व धरणे भरलेली आहेत. शेतकऱ्यांनी पडलेल्या अत्यल्प पावसावर खरीपाची पेरणी करून पिके उभी केली होती. या भागात जरी मोठे पाऊस झाले नसले तरी अधूनमधून पडणाऱ्या पावसाने यावर्षी खरीप हंगामातील पिके जोमदार होती. परंतु पुन्हा एकदा हवामानाच्या लहरीपणाचा फटका मतदार संघातील खरीप पिकांना बसला आहे.
पारनेरचा आमदार शिवसेनेचा होणार…, पठारेंनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले!
सलग दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आणि बुधवार (दि.२५) रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मतदार संघातील काही गावातील काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी, मका, कापूस तसेच भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
सदरच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी गुरुवार (दि.२६) रोजीचे आपले पूर्व नियोजीत सर्व कार्यक्रम रद्द करून सकाळीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देवून आपण यापूर्वी देखील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून दिलेली आहे. त्यामुळे या नुकसानीची देखील भरपाई मिळवून देवू, अशी ग्वाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली.
दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून आमदार काळेंनी तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.