तुम्ही इतक्या कमकुवत मनाचे आहात का? की एखाद्याच्या जीवावर…; झावरेंवरील हल्ल्याप्रकरणी तनपुरे संतापले

तुम्ही इतक्या कमकुवत मनाचे आहात का? की एखाद्याच्या जीवावर…; झावरेंवरील हल्ल्याप्रकरणी तनपुरे संतापले

अहमदनगर – नगर दक्षिण लोकसभेला शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) भाजपचे सुजय विखेंचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण पेटले असून समर्थक आमने-सामने आले होते. काल लंके यांचे समर्थक असलेल्या राहुल झावरेंव (Rahul Zaware) जीवघेणा हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झालेत. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी संताप व्यक्त केला आहे.

NDA आघाडी देशाच्या इतिहासातील यशस्वी युती असेल; विजयी खासदारांना मोदींनी दिला ‘कानमंत्र’ 

लोकांनी दिलेला जनादेश स्वीकारणे इतके कठीण आहे का? तुम्ही इतक्या कमकुवत मनाचे आहात का? की थेट एखाद्याच्या जीवावर उठाल. झावरे यांच्यावर क्रूर हल्ला झाला. या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन गृहमंत्र्यांनी आरोपींना कडक शासन द्यावे, अशी मागणी तनपुरे यांनी केली आहे.

तनपुरेंचे गृहमंत्र्यांना साकडे
तनपुरे यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली त्यात त्यांनी लिहिलं की, लोकांनी दिलेला जनादेश स्वीकारणे इतके कठीण आहे का? तुम्ही इतक्या कमकुवत मनाचे आहात का? की थेट एखाद्याच्या जीवावर उठाल. अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून आपल्या मातीशी प्रामाणिक राहणारे निलेश लंके यांना लोकांनी बहुमताने निवडून दिले. ४८ तास उलटत नाहीत तोच त्यांचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला गेला. या हल्ल्यात झावरे सुदैवानं थोडक्यात बचावले आहेत, असं तनपुरे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत तीन कट्टरपंथी विजयी : इंदिरा गांधींच्या मारकेऱ्याचा मुलगा बनला ‘खासदार’ 

पुढं त्यांनी लिहिलं की, कुठे महापौर, कुठे माझी नगरसेवक तर कुठे सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाहीत. दिवसाढवळ्या लोकांवर हल्ला होत असल्याच्या घटना राज्यात सर्वत्र घडत आहेत. झावरे यांच्यावरही क्रूर हल्ला झाला. या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन गृहमंत्र्यांनी आरोपींना कडक शासन द्यावे, अशी मागणी आमदार तनपुरेंनी केली.

नेमकं प्रकरण काय?
नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या दिवसांपासूनच लंके विरुद्ध विखे असा राजकीय संघर्ष समोर आला. या निवडणुकीत लंके यांनी विजयाचा गुलाल उधळला. मात्र आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. गुरुवारी विखे – लंके समर्थक पारनेरमध्ये भिडले. राहुल झावरे आणि विजय औटी हे आपापल्या कार्यकर्त्यांबरोबर समोरसमोर येऊन ही धुमचक्री झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात गाड्यांचे फोडाफोडी झाली व यामध्ये झावरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर पारनेरमध्ये पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.

दौरा अर्ध्यावर सोडत लंके समर्थकाच्या भेटीस
खासदारकीचा विजयी गुलाल उधळताच निलेश लंके हे श्रीगोंदा येथे गेले होते. मात्र आपले समर्थक तसेच सहकारी असणारे राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समजताच लंके यांनी आपला दौरा अर्ध्यामध्ये सोडला. त्यांनी थेट नगरकडे धाव घेत झावरे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. निवडणुकीत पराभव जरी झाला तरी तो आनंदाने पचवता आला पाहिजे. मात्र काहींनी पराभवच मान्य नाही, या घटनेला मला राजकीय रंग द्यायचा नाही. कारण निवडणुकीतील विजयानंतर मी कुठल्याही पक्षाच्या किंवा नेत्यांवरती टीका टिपणी किंवा भाष्य केले नाही. मात्र पारनेर असो वा नगर अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बिमोड झाला पाहिजे, अशी मागणी लंके यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज