NDA आघाडी देशाच्या इतिहासातील यशस्वी युती असेल; विजयी खासदारांना मोदींनी दिला ‘कानमंत्र’
नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील NDA च्या नवनिर्वाचित खासदारांनी आज (दि.7) नरेंद्र मोदींची (Narendra Modi) NDA संसदीय पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड केली. यावेळी मोदींनी उपस्थित खासदारांना संबोधित करताना NDA आघाडी देशाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आघाडी असेल असा विश्वास व्यक्त केला.NDA संसदीय पक्षाचे नेते म्हणून नरेंद्र मोदींचे नाव प्रथम भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी प्रस्तावित आणि त्यानंतर NDAच्या इतर नेत्यांनी त्याला अनुमोदन दिले. या पाठिंब्यानंतर आता पुन्हा तिसऱ्यांदा मोदींचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (NDA Most Successful Alliance In India’s History Says Narendra Modi In NDA Parliamentary Meet)
Video : एकच खासदार तरीही दिल्लीत अजितदादांचा दबदबा; मिळाला ‘स्पेशल’ मान
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे कोणते?
संविधान भवनमधील सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या बैठकीला संबोधित करताना मोदी म्हणाले की, या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व घटक पक्षांचे नेते, सर्व नवनिर्वाचित खासदार आणि आमच्या राज्यसभा खासदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज एवढ्या मोठ्या समुहाचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. जे नेते विजयी झाले ते सर्व अभिनंदनास पात्र असल्याचे मोदी म्हणाले. ज्या लाखो कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली त्यांचादेखील या विजयात मोलाचा वाटा असल्याचे मोदी म्हणाले.
भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आघाडी असेल
एनडीए आघाडी भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आघाडी म्हणून ओळखली जाईल. भारताच्या इतिहासातील ही सर्वात यशस्वी युती असल्याचेही ते म्हणाले. सर्व निर्णयांमध्ये एकमताने पोहोचण्याचा आमचा उद्देश असेल. एनडीए सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येणे ही अभिमानाची बाब असून, हा विजय माझ्यावरील आणि भाजपच्या नेत्यांवरील विश्वास दर्शवतो.मी खूप भाग्यवान आहे कारण तुम्ही सर्वांनी एकमताने माझी एनडीएचा नेता म्हणून निवड केली आहे. या निवडीनंतर माझी जबाबदारी आणखी वाढली आहे.
Video : चार वेळा वदवून सांगितलं सोबत राहू; ‘पलटू पंटर’ नितीश कुमारांनी गाजवली NDA ची बैठक
2019 मध्ये दिला होता विश्वासावर भर
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, 2019 मध्ये जेव्हा तुम्ही मला निवडून दिले होते. तेव्हा मी सभागृहात बोलताना विश्वास या गोष्टीवर भर दिला होता. त्यानंतर आज पुन्ही तुम्ही सर्वांनी माझी नेतेपदी निवड केली आहे. याचाच अर्थ आपल्यातील एकमेकांवरील विश्वासाचा पूल दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे हे आजच्या निवडीवरून अधोरेखित होत आहे. आपल्यातील नाते विश्वासाच्या भक्कम पायावर उभे असून, हीच सर्वात मोठी संपत्ती असल्याचे मोदी म्हणाले.
पुढील 10 वर्षात एनडीए सरकार सुशासन, विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेप यावर भर देणार असल्याचे मोदींनी सांगितले. देशातील करोडो नागरिकांनी आम्हाला पुन्हा देश चालण्यासाठी जे बहुमत दिले आहे. त्यासाठी आम्ही देशाला पुढे नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू त्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही असा शब्द मोदींनी भारतीयांना दिला.
भव्य राम मंदिरानंतरही भाजपने अयोध्या का गमावली? वाचा ग्राऊंड रिअॅलिटी
ईव्हीएमचा उल्लेख करत विरोधकांवर हल्लाबोल
मला तर वाटत होतं की आता विरोधक ईव्हीएमची अंत्यसंस्कार करण्याचीच तयारी करत आहेत. पण याच ईव्हीएमने या लोकांची तोंडं बंद केली. यांनी निवडणूक आयोगावर प्रचंड टीका केली. न्यायालयात गेले. कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला गेला. हा त्यांच्या षडयंत्राचा भाग होता. त्यांचा ईव्हीएम विरोध म्हणजे हे लोक जुन्या विचारांचं प्रतिनिधीत्व करतात असं मी मानतो. निवडणूक निकालाच्या काळात देशात हिंसाचार घडवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला होता. लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न या लोकांंनी केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
पुढल्या दहा वर्षांतही काँग्रेस शंभरी गाठणार नाही
न हम हारे थे न हम हारे है असा शब्द उच्चारत मोदींनी विरोधकांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. मोदी पुढे म्हणाले, चार तारखेनंतर आमचं जे वागणं होतं त्यातून हे दिसत होतं की आम्ही विजय सुद्धा पचवू शकतो. पराजित झालेल्यांची थट्टा करण्याची विकृती आम्ही ठेवत नाही असे संस्कार आमच्यात नाहीत. दहा वर्षांनंतरही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आला नाही. मागील तीन निवडणुकीत त्यांना जितक्या जागा मिळाल्या नाहीत त्यापेक्षा जास्त जागा आम्हाला या निवडणुकीत मिळाल्या. दहा वर्षांनंतरही काँग्रेस शंंभरचा आकडा गाठणार नाही, असा खोचक टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.