पत्नीसाठी खासदार लंके मैदानात; शिबिराच्या माध्यमातून विधानसभेची मोर्चेबांधणी…
MP Nilesh Lanke News : येणाऱ्या काळात राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly Election) पार पडणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उमेदवारांकडून आपापल्या मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्याचे काम सुरु आहे. अशातच राज्यात गाजलेल्या नगर दक्षिण लोकसभेत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी खासदारकीला गवसणी घातली. आता लंके यांनी आपल्या पाठोपाठ पत्नी राणी लंके (Rani Lanke) यांच्यासाठी विधानसभेची मोर्चेबांधणी सुरु केल्याची चर्चा मतदार संघात सुरु आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघात नागरिकांसाठी शिबीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आलंय. शिबिराच्या माध्यमातून राणी लंके यांच्याकडून विधानसभेची मोर्चेबांधणी सुरु आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने राणी लंके उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं बोललं जातंय. जागावाटपाची चर्चा झाली नसली तरीही लंकेंकडून विधानसभेची तयारी सुरु असल्याचं दिसतंय.
Bitcoin Holdings : भूतान बनला बिटकॉइनचा साठा असलेला जगातील चौथा सर्वात मोठा देश
देशात काही दिवसांपूर्वीच लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळवता आले. यातच अहमदनगर लोकसभा मतदार संघामध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके झालेल्या निवडणुकीत लंके यांनी विजय मिळवला. तसेच विशेष म्हणजे लंके यांच्या या विजयात पारनेर करांचा देखील मोठा वाटा राहिला. लंके यांना पारनेरमधून चांगले मताधिक्य मिळाले. यामुळे लोकसभेच्या विजयांनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी पारनेर मतदार संघातील राजकीय गणित बदलताना दिसू लागली आहे. पारनेरमधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या विधानसभेची तयारी करत आहे. यातच खुद्द खासदार लंके देखील पत्नीसाठी मैदानात उतरल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत आहे. शिबिराच्या माध्यमातून खासदार लंके देखील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहे.
शिबीर-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी
पारनेर मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना राणी लंके यांची उपस्थिती तसेच सध्या स्थितीला मतदार संघामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन कारणात आले आहे. शिबीर सप्ताहाच्या माध्यमातून राणी लंके यांनी मतदार संघामध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांच्या जागेवर पक्षाच्या वतीने राणी लंके या प्रथम दावेदार असल्याचं दिसतंय. तालुक्यात सध्या विविध कार्यक्रमांत आणि सोशल मीडियावर देखील भावी आमदार अशी उपाधी राणी लंके यांच्या नावापुढे जोडली जातेय. सध्या पारनेर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून त्याच या विधानसभेसाठी दावेदार असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून श्रीकांत पठारे हे देखील इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत YouTube चॅनेल हॅक; अमेरिकन कंपनीच्या व्हिडिओचे प्रमोशन
विखे लोकसभेचा बदला घेणार का?
यंदाच्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली होती. महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी दणक्यात विजय मिळवला. लोकसभेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी विखेंकडून पारनेर मध्ये कोणाला ताकद देण्यात येणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. कारण पारनेर मध्ये महायुतीमधून अनेक जण इच्छुक आहे मात्र यामध्ये सुजित झावरे यांचे देखील नाव चर्चेत आहे. लोकसभेचा बदला घेण्यासाठी विखेंकडून सुजित झावरेंना पाठबळ मिळणार का हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे ठरणार आहे.
2019 ची विधानसभा निवडणूक
2019 च्या विधानसभा निवडणुकी मध्ये पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये लढत झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नीलेश ज्ञानदेव लंके 1,39,963 मतांनी विजयी झाले होते, तर शिवसेनेचे विजय औटी यांचा 59,838 मतांनी पराभव झाला होता. सध्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीसह शिवसेनेचा ठाकरे गट देखील या जागेसाठी आग्रही आहे. यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पारनेरची जागा सेनेला मिळावी यासाठी वरिष्ठांकडे आग्रह करणार असल्याचे देखील बोलले होते. यामुळे येणाऱ्या काळात हि जागा कोणाच्या वाटेला जाणार व कोण उमेदवार असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.